देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिकेवर २३ जुलैला 'सर्वोच्च' फैसला!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 12:21 PM2019-07-03T12:21:57+5:302019-07-03T12:31:21+5:30

निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन खटल्यांची माहिती लपवल्याचा आरोप

pending criminal cases against devendra fadnavis supreme court posts for final disposal on July 23 | देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिकेवर २३ जुलैला 'सर्वोच्च' फैसला!

देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिकेवर २३ जुलैला 'सर्वोच्च' फैसला!

Next

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 23 जुलैला अंतिम सुनावणी होणार आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन खटल्यांची माहिती लपवल्याप्रकरणी आरोप अ‍ॅड. सतीश उके यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. देवेंद्र फडणवीस यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी त्यांनी याचिकेतून केली आहे. 




२०१४ मध्ये फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. हे दोन्ही गुन्हे नागपूरमधील असून त्यातील एक गुन्हा मानहानीचा आणि दुसरा गुन्हा फसवणुकीचा असल्याचं म्हटलं आहे. फडणवीस यांनी दोन्ही गुन्हे लपवून खोटं प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा दावाही उके यांनी केला आहे. फडणवीस यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणीदेखील त्यांनी केली आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयानं फडणवीस यांना आधीच दिलासा दिलेला आहे. 

Web Title: pending criminal cases against devendra fadnavis supreme court posts for final disposal on July 23

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.