प्रलंबित शिष्यवृत्ती आठवडय़ाभरात
By admin | Published: June 10, 2014 01:41 AM2014-06-10T01:41:01+5:302014-06-10T01:41:01+5:30
राज्यातील सर्व विभागांतील मागासवर्गीय तसेच इतर मागासवर्गीय विद्याथ्र्यांची प्रलंबित शिष्यवृत्तीची रक्कम देण्यासाठी येत्या 12 जून रोजी पुरवण्या मागण्यांद्वारे तरतूद केली जाईल.
Next
>मुंबई : राज्यातील सर्व विभागांतील मागासवर्गीय तसेच इतर मागासवर्गीय विद्याथ्र्यांची प्रलंबित शिष्यवृत्तीची रक्कम देण्यासाठी येत्या 12 जून रोजी पुरवण्या मागण्यांद्वारे तरतूद केली जाईल. तसेच मागण्या मान्य झाल्यानंतर या निधीचे तातडीने वितरण करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधान परिषदेत जाहीर केले.
दीपक साळुंखे यांनी राज्यात वैद्यकीय शिक्षण घेणा:या आर्थिकदृष्टय़ा दुर्बल विद्याथ्र्याना शिष्यवृत्ती अदा करण्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावरील उत्तरात हस्तक्षेप करताना उपमुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. पुरवणी मागण्यांमधील तरतूद सभागृहाच्या मान्यतेनंतर तातडीने वितरित केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. नव्याने प्रवेश घेणा:या विद्याथ्र्याना शिष्यवृत्तीच्या मुद्दय़ावरून अडवू नये. त्यांची शिष्यवृत्ती अदा केली जाईल, अशा सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्याचेही पवार यांनी सांगितले.
त्याआधी वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, वैद्यकीय महाविद्यालयांमधील 4 हजार 379 विद्याथ्र्याना शिष्यवृत्तीपोटी 3क् कोटी 5क् लाख रुपये द्यायचे आहेत. तीन वर्षापासून ही शिष्यवृत्ती प्रलंबित राहण्यामागे कोण जबाबदार आहे, याची माहिती घेतली जाईल. प्रकाश बिनसाळे, दिवाकर रावते, भाऊसाहेब फुंडकर, रामदास कदम, हेमंत टकले, आशिष शेलार, कपिल पाटील, हरिभाऊ राठोड आदींनी उपप्रश्न विचारले. (विशेष प्रतिनिधी)
कबीर कला मंचच्या माध्यमातून माओवादी विचारांचा प्रसार - पवार
1कडव्या माओवादी विचारसरणीचा व सीपीआय (माओ) या संघटनेच्या प्रचारासाठी कबीर कला मंचचा वापर करण्यात येत आहे. याबाबतचे भक्कम पुरावे राज्य शासनाकडे आहेत. त्या आधारेच शासनाने दोषारोपपत्र दाखल केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतच्या तारांकित प्रश्नाला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.
2राज्यातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारा या जिल्ह्यांचा उल्लेख ‘नक्षलग्रस्त’ असा न करता ‘डावी कडवी विचारसरणीग्रस्त जिल्हे’ असा केल्याबद्दलचा प्रश्न शिवसेनेचे दिवाकर रावते, डॉ दीपक सावंत, अॅड. अनिल परब यांनी विचारला होता. यावर केंद्र सरकारच्या 1क्क् टक्के साहाय्यित एकात्मिक कृती आराखडय़ाचा दाखला दिला. या आराखडय़ानुसार 2क्14 पासून गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदियासह देशाच्या 88 निवडक आदिवासी व मागास जिल्ह्यांत निधीचे वाटप करण्यात आले.
3केंद्राच्या वितरण विभागाने या जिल्ह्यांचा उल्लेख डावी कडवी विचारसरणीग्रस्त जिल्ह्यांकरिता अतिरिक्त केंद्रीय साहाय्य असा केला आहे. त्यामुळे नक्षलग्रस्त जिल्ह्यांचा उल्लेख तसा झाल्याचे पवार आपल्या लेखी उत्तरात म्हणाले. कबीर कला मंचाच्या व्यासपीठाचा उपयोग माओवादी विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी झाल्याचा आणि त्याच्या भक्कम पुराव्यांच्या आधारेच न्यायालयात दोषारोप पत्न दाखल केल्याचा दावा त्यांनी केला.
च्परभणी येथे उभारण्यात येणा:या महिला रुग्णालयाची इमारत जून महिन्याअखेर पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिले. परभणी येथे 6क् खाटांच्या महिला रुग्णालयाचे बांधकाम अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. नगर परिषदेची परवानगी आणि शासनाचे पूर्णत्वाचे प्रमाणपत्र न मिळाल्याने काम रखडले होते.
च्अब्दुलाखान दुराणी, विक्रम काळे, सतीश चव्हाण या सदस्यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. रुग्णालय पूर्ण क्षमतेने कधी सुरू होणार, या प्रश्नाला आरोग्यमंत्री समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. मात्र, जून महिन्याअखेर इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
दहा सदस्यांचा शपथविधी
च्राज्यपालांनी नामनिर्देशित केलेल्या दहा सदस्यांनी आज विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली.
च्मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात सभापती शिवाजीराव देशमुख यांनी नवनियुक्त सदस्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. जनार्दन चांदुरकर, विद्या चव्हाण, उस्नोबानो खलिफे, प्रकाश गजभिये, राहुल नार्वेकर, आनंदराव पाटील, ख्वाजा बेग, रामहरी रूपनवर, रामराव वडकुते आणि जगन्नाथ शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली.
च्दोनच दिवसांपूर्वी राज्यपालांनी या सदस्यांना नामनिर्देशित केले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा तर काँग्रेसच्या चार सदस्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीने यादी मुख्यमंत्र्यांना पाठविताना प्रा. फौजिया खान यांच्या नावाची शिफारस केली नाही. तर काँग्रेस आपल्या कोटय़ातील दोन नावे पाठवू शकले नाहीत.
किडनी प्रत्यारोपण
प्रक्रियेचा आढावा घेणार
आपल्या राज्यातील मूत्रपिंड प्रत्यारोपण प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी अन्य राज्यांमध्ये याबाबत असणा:या योजनांचा आढावा घेतला जाईल, असे आरोग्य राज्यमंत्री प्रा. फौजिया खान यांनी अन्य एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी 3 हजार 2क्7 रुग्णांची नोंद आहे. अशा रुग्णांना मदत करण्यासाठी संबंधित समितीची दर आठवडय़ाला बैठक होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. डायलिसीसच्या रुग्णांमध्ये होत असलेली वाढ तसेच या रुग्णांना उपचारासाठी लागणारा खर्च विचारात घेता अशा रुग्णांसाठी काय करता येईल, हे ठरविण्यासाठी आपल्या दालनात बैठक घेण्याचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी जाहीर केले.