महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आंदोलनातील वारसांना निवृत्तीवेतन; किती रुपये, कोणत्या जिल्ह्यात किती वारसदार.. जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 13:54 IST2025-02-25T13:50:20+5:302025-02-25T13:54:04+5:30
संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी या अनुदानाचे वाटप करावयाचे आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आंदोलनातील वारसांना निवृत्तीवेतन; किती रुपये, कोणत्या जिल्ह्यात किती वारसदार.. जाणून घ्या
कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न आंदोलनातील हुतात्म्यांच्या वारसांना जानेवारी ते मार्च २०२५ साठीचे ५ लाख ४० हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. त्याचा शासन आदेश काढण्यात आला आहे.
या आंदोलनातील एकूण ११ हुतात्म्यांच्या वारसांना प्रत्येकी दरमहा २० हजार निवृत्तीवेतन, वार्षिक प्रवास भत्ता ५०० आणि आकस्मिक मदत म्हणून वार्षिक ५ हजार रुपये दिला जातो. या ११ वारसांमध्ये मुंबई शहरातील ३, कोल्हापूर जिल्ह्यातील ५ आणि रत्नागिरीतील एका जणाचा समावेश आहे.
मुंबईसाठी १ लाख ८० हजार, कोल्हापूरसाठी ३ लाख आणि रत्नागिरीसाठी ६० हजार असे एकूण ५ लाख ४० हजारांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी या अनुदानाचे वाटप करावयाचे आहे.