Anna Hazare: जनताच कुंभकर्णासारखी झोपलीय, एकटा काय करू? अण्णा हजारेंचा उद्विग्न सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 10:18 AM2021-08-28T10:18:31+5:302021-08-28T10:18:41+5:30
जनआंदोलन समितीने पत्रकार परिषद घेऊन तीन कृषी कायदे, बेरोजगारी, इंधन दरवाढ आणि देशात सुरू असलेले सरकारी कंपन्या विकण्याचे धोरण यावर केंद्र सरकारविरुद्ध आवाज उठविण्याचे आवाहन हजारेंना केले होते. त्यानंतर शुक्रवारी जन आंदोलन समितीचे पदाधिकारी अण्णांना भेटले.
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगणसिद्धी (नगर) : आपण आंदोलने करून लोकहिताचे अनेक कायदे मंजूर करून घेतले; मात्र आता केंद्र सरकारला वाटेल ते कायदे बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात येत आहेत. जनताच कुंभकर्णासारखी झोपली असून, मी एकटा काय करू?. जनतेने आवाज उठवून सरकार बदलण्याची ताकद उभी केली पाहिजे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.
जनआंदोलन समितीने पत्रकार परिषद घेऊन तीन कृषी कायदे, बेरोजगारी, इंधन दरवाढ आणि देशात सुरू असलेले सरकारी कंपन्या विकण्याचे धोरण यावर केंद्र सरकारविरुद्ध आवाज उठविण्याचे आवाहन हजारेंना केले होते. त्यानंतर शुक्रवारी जन आंदोलन समितीचे पदाधिकारी अण्णांना भेटले.
अण्णा म्हणाले की, माझे वय ८४ वर्षे आहे. मी किती वर्षे लढू? युवकांनी लढा उभारावा, मी अवश्य येईल; दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला तुम्ही पाठबळ द्या, अशी विनंती
यावेळी करण्यात आली असता, हजारे म्हणाले की, दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांनी आपल्याशी याबाबत संपर्क केलेला नाही.