देशातील जनता सर्वात स्मार्ट - नरेंद्र मोदी
By admin | Published: June 25, 2016 06:24 PM2016-06-25T18:24:36+5:302016-06-25T18:27:49+5:30
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते स्मार्ट सिटी योजनेचं उद्घाटन करण्यात आलं, यावेळी बोलताना मराठीतून सर्वांना नमस्कार करून मोदींनी भाषणाला सुरुवात केली
Next
>
ऑनलाइन लोकमत -
पुणे, दि. 25 - देशातील जनता सर्वात स्मार्ट असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते स्मार्ट सिटी योजनेचं उद्घाटन करण्यात आलं. पुणे महापालिकेचे महापौर प्रशांत जगताप यांनी नरेंद्र मोदींचं स्वागत केलं. यावेळी बोलताना मराठीतून सर्वांना नमस्कार करून मोदींनी भाषणाला सुरुवात केली.
जगातील अनेक देश आपल्यानंतर स्वतंत्र झाले, गरिब परिस्थितीतून येऊनही त्यांनी विकास केला. जर लोकांच्या हाती सुत्रं दिली तर सरकारची गरजही भासणार नाही. गरिबी हटवण्याची क्षमता शहरांमध्ये आहे. गरिबीला जेवढं जास्त पचवू शकू तेवढा विकास जास्त होईल असं सांगताना नरेंद्र मोदींनी शहरीकरण संकट नसून संधी असल्याचं म्हटलं आहे. शहरं सामर्थ्यवान असतील तर गरिबी मिटवू शकतील असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.
टाकाऊपासून टिकाऊ तयार करण्याचं मिशन हाती घेण्यात येणार आहे. शहरातील कच-यापासून खतनिर्मिती प्रकल्प तयार करण्यात येणार असून, निर्माण करण्यात आलेल्या खतावर सबसिडी देण्याचाही सरकार विचार करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे. तसंच सांडपाण्याचं योग्य नियोजन करण्यावर भर असल्याचंही मोदी बोलले आहेत.
प्रसारमाध्यमांनी स्मार्ट सिटी योजनेचं अभियान चालवल्याबद्दल मोदींनी प्रसारमाध्यमांच कौतुक करताना पाण्याची समस्या असल्यामुळे क्रिकेट मॅच दुसरीकडे खेळवण्याच्या बातम्या दाखवण्यावरुन टोमणाही मारला. पाणीटंचाईमुळे क्रिकेट सामना दुसरीकडे खेळवला तरी 350 दिवस म्हणजे रोजच खेळपट्टीवर पाणी मारावं लागतं असं सांगत मोदींनी प्रसारमाध्यमांवर टीका केली.
मोदींच्या भाषणातील मुद्दे -
-मराठीतून सर्वांना नमस्कार करून नरेंद्र मोदींनी केली भाषणाला सुरुवात.
-सरकारची प्रगतीच्या दिशेने वाटचाल
-जगातील अनेक देश आपल्यानंतर स्वतंत्र झाले, गरिब परिस्थितीतून येऊनही त्यांनी विकास केला
-देशाचा नागरिक सर्वात जास्त स्मार्ट
-लोकांच्या हाती सुत्रं दिली तर सरकारची गरज भासणार नाही
-आपल्या देशात रस्त्याच्या एका बाजूला काम झालं, तर दुस-या बाजूचे आंदोलन करतात
-शहरांची निवड आम्ही नाही केली, तर तिथल्या लोकांनी केली, त्यांचं अभिनंदन करा
-काही प्रसारमाध्यमांचंही केलं अभिनंदन
-सरकारी खजिन्यातून मिळणा-या योजनाच प्रसिद्ध होत होत्या मात्र आता स्वच्छता आपल्या देशात लोकप्रिय विषय झाला -आहे
-शहरीकरणाला खूप मोठं संकट मानलं जायचं, शहरीकरणाला समस्या नाही तर संधी म्हणून पाहावं
-आर्थिक क्षेत्रातील लोक विकासाच्या दृष्टीने शहराकडे पाहतात
-गरिबी सांभाळण्याची जास्त ताकद शहराकडे असते
-प्रत्येक शहराची वेगळी आत्मा, ओळख असते
-तंत्रज्ञानाचं रुपांतर सामूहिक सेवेत केलं गेलं पाहिजे
-एकत्रित विचार केला नाही तर विकास होणार नाही -
-आजकाल पाण्याचं संकट आहे, प्रसारमाध्यम पण कमाल करतात, पाणी वाया जातं म्हणून क्रिकेट मॅच दुसरीकडे खेळायला लावतात
-क्रिकेट मैदानावर 365 दिवस पाणी मारायलाच लागत
-सांडपाण्याचं रुपांतर शुद्ध पाण्यात करणार
-योजना नाही तर लोकांमुळे देशाचा विकास होतो
-सर्व राज्यांना स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन करतो
-25 लाख लोकांनी स्मार्ट सिटीवर सूचना पाठवल्या
-गरिबीला जेवढं जास्त पचवू शकू तेवढा विकास जास्त होईल
-टाकाऊपासून टिकाऊ तयार करण्याचं मिशन
-निर्माण कऱण्यात आलेल्या खतावर सबसिडी देण्याचाही सरकार विचार