दौंडची जनता दूधखुळी नाही

By admin | Published: May 17, 2016 02:11 AM2016-05-17T02:11:11+5:302016-05-17T02:11:11+5:30

जी कामे पाठपुराव्याच्या माध्यमातून मार्गी लागली ती कोणी केली, हे जनतेला सांगण्याची आवश्यकता नाही.

The people of Daund are not milk-eaten | दौंडची जनता दूधखुळी नाही

दौंडची जनता दूधखुळी नाही

Next


पाटेठाण : दौंड तालुक्यात रस्ते, वीज, पाणी यासारख्या ज्वलंत विषयांवरील अनेक प्रलंबित कामे दूरगामी दृष्टिकोनातून मार्गी लागलेली असून, जी कामे पाठपुराव्याच्या माध्यमातून मार्गी लागली ती कोणी केली, हे जनतेला सांगण्याची आवश्यकता नाही. तालुक्यातील जनता दूधखुळी नसून सूज्ञ आहे. राजकारणात आजतागायत श्रेयवादाचा विचार न करता प्रामाणिकपणे विकासकामांवर भर देऊन कामे करीत आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेने विश्वास ठेवून आमदारपदी काम करण्याची संधी दिली, असे मत आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले.
खामगाव (ता. दौंड) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित २ कोटी ८२ लाख रुपयांच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला धर्मवीर संभाजीमहाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तालुक्यातून जाणाऱ्या अष्टविनायक रस्ते मार्गामुळे अनेक गावांचा कायापालट होण्यासाठी मदत होईल. वाघोली-राहू-पारगाव रस्त्यासाठी सुमारे १०५ कोटी रुपये निधी अपेक्षित असून ही प्रस्तावित कामे लवकरच मार्गी लागणार आहेत. पाण्यासारख्या ज्वलंत विषयांवर राजकारण न करता एकत्र लढा दिला, तरच भविष्यात शेतीसाठी पाणी मिळणार असून तालुक्यातील अनेक वीज वितरण उपकेंद्रांची क्षमता वाढविण्यात येत आहे. यामुळे विजेची समस्या सुटणार असल्याचे राहुल कुल यांनी सांगितले.
या वेळी जिल्हा परिषद सदस्य बंडोपंत नवले म्हणाले, ‘‘विरोधक मंडळींचे मानसिक संतुलन बिघडले असल्याने ते न केलेल्या विकासकामांचेदेखील फुकटचे श्रेय लाटत आहेत.’’
या वेळी ग्रामपंचायतीच्या वतीने अपंग लाभार्थ्यांना मिक्सर तसेच शौचालय लाभार्थ्यांना अनुदानवाटप आमदार कुल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी भीमा-पाटसचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, माजी उपसभापती शिवाजी दिवेकर, भीमा-पाटसचे संचालक प्रकाश शेळके, चंद्रकांत नागवडे, पंचायत समिती सदस्य किसन शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता जाधव, एस. आर. गांधी, मोहन म्हेत्रे, बापूसाहेब मेहेर, सरपंच विमल खेडेकर, नंदा यादव, अशोक नागवडे, अनिता कोळपे, कैलास खेडेकर, रोहिदास टिळेकर, प्रदीप जगताप, अप्पाराव कोळपे, ग्रामसेवक राजेंद्र जगताप यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
डॉ. संदीप खेडेकर यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल बर्वे यांनी सूत्रसंचालन केले. संतोष नागवडे यांनी आभार मानले.
(वार्ताहर)

Web Title: The people of Daund are not milk-eaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.