काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर दगड फेकू नये- मुख्यमंत्री

By admin | Published: July 21, 2016 05:44 AM2016-07-21T05:44:14+5:302016-07-21T05:44:14+5:30

मला गृहखात्यातील काही कळतं की नाही, याचं मूल्यमापन जनताच करेल, पण राणे यांचा गृहखात्याचा अनुभव दांडगा आहे.

The people in the glass house should not throw stones at another- Chief Minister | काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर दगड फेकू नये- मुख्यमंत्री

काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर दगड फेकू नये- मुख्यमंत्री

Next


मुंबई : ‘मला गृहखात्यातील काही कळतं की नाही, याचं मूल्यमापन जनताच करेल, पण राणे यांचा गृहखात्याचा अनुभव दांडगा आहे. खालपासून वरपर्यंत त्यांना बरीच माहिती आहे,’ असा टोला लगावत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुन्हेगारीची आकडेवारी सांगत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते नारायण राणे यांचे पुरते वस्त्रहरण केले. आपल्या तासभराच्या भाषणात विरोधकांवर मार्मिक टोलेबाजी करत, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगडफेक करू नये, असा इशारा द्यायलाही मुख्यमंत्री विसरले नाहीत.
नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर झालेला अनन्वित अत्याचार आणि खुनाच्या घटनेसंदर्भात विधान परिषदेत विरोधकांनी उपस्थित केलेल्या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी बुधवारी उत्तर दिले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँँग्रेस नेते नारायण राणे यांनी केलेल्या प्रत्येक आरोपांची त्यांनी मुद्देसूद चिरफाड केली.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘मी कोपर्डीला घटनास्थळी भेट दिली नाही, म्हणून माझ्या हेतूवर शंका घेऊ नका. नागपुरात ११५ गोवारी मृत्युमुखी पडले होते, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार तेथे गेले नाहीत, म्हणून ते असंवेदनशील होते, असा आरोप करणे योग्य होणार नाही. राजकीय भाषण मला देता येत नाही, पण झालेल्या आरोपांना उत्तर दिले नसते, तर लोकांना ते खरे वाटले असते. कोपर्डी प्रकरणावरून राज्यात दुफळी माजण्याची शक्यता असताना विधिमंडळाच्या दोन्ही सदनातून राज्याला एकमताने संदेश द्यायला हवा. राज्य पिडीतांच्या कुटुंबीयांसोबत आहे. नराधमांना फाशी होईलच, असे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात सध्या तीन मुख्यमंत्री आहेत, असा आरोप राणे यांनी केला होता. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात तीन ह्यसीएमह्ण नाहीत, मी एकच आहे आणि सक्षम आहे. तीन ह्यसीएमह्णची सवय तुम्हाला असेल. तुमच्यासारखा एक रवी इकडे आणि एक रवी तिकडे अशी गरज मला नाही, असा टोलाही त्यांनी राणेंना हाणला. आम्ही सुडाचे राजकारण करीत नाही. पण ईडी आणि सीआयडीच्या कारवाईला राणेंसारख्या सज्जन, सत्शील माणसाने का घाबरावे? असा तिरकस सवालही केला.
भाजपाला गुंडांचा पक्ष म्हटले गेले. पण हे सांगतंय कोण? सिंधुदुर्गात कोणावर काय गुन्हे आहेत हे सांगितले, तर पार्टी आॅफ क्रिमीनल कोण आहे हे कळेल. खरे तर रमेश गोवेकरचे काय झाले, अंकुश राणेचे काय झाले, श्रीधर नाईक कुठे आहे, असे प्रश्न राणेंनी विचारायला हवे होते, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राणेंच्या गुन्ह्यांचा पाढाच वाचला. सिंधुदुर्गात राणेंच्या विरोधात दाखल गुन्ह्यांच्या कलमे वाचून दाखवितानाच ‘शिशे के घरो में रहने वाले, दुसरों के घरोंपर पत्थर नही फेका करते’, असा डायलॉगही मुख्यमंत्र्यांनी ऐकवला.
भाषणात मुख्यमंत्र्यांनी राणे यांची अनेकदा फिरकी घेतली. राणेंना राग आल्यानंतर ते जे बोलतात ते फार गांभिर्याने घ्यायचे नसते. केंद्रातील काँग्रेस नेत्यांसह विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव यांना राणे यांनी काय म्हटले होते याचा पाढाच मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवला. (प्रतिनिधी)

Web Title: The people in the glass house should not throw stones at another- Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.