महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी शिकणे गरजेचे; भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 06:43 AM2022-09-16T06:43:19+5:302022-09-16T06:43:39+5:30

आर्य समाज, वाशी यांच्या वतीने आयोजित विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यामध्ये ते बोलत होते.

People living in Maharashtra need to learn Marathi Says Governor Bhagat Singh Koshyari | महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी शिकणे गरजेचे; भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन

महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी शिकणे गरजेचे; भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन

googlenewsNext

 नवी मुंबई : महाराष्ट्रात सर्वांना हिंदी भाषा समजते. हिंदी भाषेचा कोणताही प्रचार न करता विस्तार होत आहे. ही भाषा सर्वांना जोडण्याचे काम करते. त्याबरोबरच आपण राहत असलेल्या महाराष्ट्रातील मराठी भाषा शिकणे गरजेचे आहे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी वाशी येथे केले.

आर्य समाज, वाशी यांच्या वतीने आयोजित विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यामध्ये ते बोलत होते. यावेळी राजस्थानमधील खा. स्वामी सुमेधानंद सरस्वती, विवेकानंदजी परिव्रजक, राजकुमार दिवाण, धर्मवीर शास्त्री आदी मान्यवर उपस्थित होते. हिंदी विषयामध्ये प्रावीण्य मिळविलेल्या नेरूळ येथील डी. ए. व्ही. पब्लिक स्कूलचे विद्यार्थी नमन ठाकूर, कुमार दिव्यम झा, वंशिका चंद, सान्वी शरण, तसेच वाशीच्या फादर ॲग्नेल स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी सिद्धेश रूपेश काळे, वाणी कौर चोप्रा, वाशी इंग्लिश हायस्कूलचे विद्यार्थी आर्यन कृष्णप्रसाद, एपीजे स्कूल नेरूळच्या संहिता रंगराजन, एपीजे स्कूल नेरूळचा विद्यार्थी अनंतजीत पांडे, डी. ए. व्ही. पब्लिक स्कूल, पनवेलची विद्यार्थिनी ईशा जाधव यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला. 

प्रत्येक विद्यार्थ्याची आवड-निवड वेगवेगळी असते. त्यांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करावे. आपण सर्वांनी शिक्षित होऊन सुसंस्कृत होणे गरजेचे आहे, असे आवाहन कोश्यारी यांनी केले. 

Web Title: People living in Maharashtra need to learn Marathi Says Governor Bhagat Singh Koshyari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.