महाराष्ट्र कुठे नेवून ठेवलाय हे राज्यातील जनतेला माहिती आहे, रावसाहेब दानवेंचा पवारांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 08:28 PM2017-09-27T20:28:51+5:302017-09-27T20:30:11+5:30
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? असा प्रश्न माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात करून सरकारवर टीका केली होती. त्यास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी उत्तर दिले.
पिंपरी : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? असा प्रश्न माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात करून सरकारवर टीका केली होती. त्यास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी उत्तर दिले. ‘राज्य सरकारच्या पारदर्शी कारभारावर जनतेला भरोसा आहे. शरद पवार हे देशातील मोठं नेतृत्व आहे. त्यांच्यावर टीका टिप्पणी करणार नाही. आम्ही काय केलंय आणि महाराष्ट्र कुठे नेवून ठेवलाय हे राज्यातील जनतेला माहिती आहे, असे दानवे यांनी पिंपरीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पिंपरी-चिंचवडमधील भारतीय जनता पक्ष जिल्हा कार्यकारणी बैठक झाली.बैठकीला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महापौर नितीन काळजे आदी उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. पुण्यातील एका कार्यक्रमात पवार यांनी भाजपावर टीका केली होती. ‘देशातील अर्थव्यवस्था कोलमडली असून, तीन वर्षांपूर्वी हेच लोक कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा? असा प्रश्न विचारत होते. आता त्यांनीच तीन वर्षांत कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र हे शोधण्याची गरज आहे, अशा टीका केली होती. त्यावर दानवे म्हणाले, ‘‘ प्रत्येक पक्षाचे मूल्यमापन करायचे झाले तर निवडणूक हे माध्यम आहे. राज्यात झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इतर निवडणुकांच्या निकालातून जनतेने आमचे मूल्यमापन केले आहे. ’’
शिवसेनेची फारकत, नारायण राणेंचा प्रवेश यावर दानवे म्हणाले, ‘‘ राज्यात राजकीय घडामोडी झाल्या तरी पक्षावर याचा परिणाम होणार नाही. आमचा पक्ष पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही.राजकीय घडामोडीकडे अजिबात लक्ष देत नाहि. शिवसेनेचे मंत्री बैठकिला येतात. त्यांचा पक्ष वाढविण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेचा आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. नारायण राणेंच्या दिल्ली भेटी दरम्यान राजकीय चचार्ही झाल्या,त्या चचेर्ला मूर्त स्वरूप मिळाल की लवकरच भूमिका स्पष्ट करू. ४३ हजार कोटींची कर्ज माफी दिली. ९९ लाख शेतकºयांना त्याचा लाभ होईल. कर्ज माफीच्या निकषात काही बदल करायचे झाल्यास करू. आॅक्टोबरमध्ये पैसे जमा होतील. राज ठाकरेच्या टिकांना उत्तर देणार नाही, पण सर्वाना व्यक्त होण्याचा अधिकार आहे. सोशल मीडियावर कुणी व्यक्त होत असेल तर आम्हीही व्यक्त होतो.’’