‘लोक मत अॅस्पायर एज्युकेशन फेअर’ ३ जूनपासून
By admin | Published: May 30, 2016 01:41 AM2016-05-30T01:41:42+5:302016-05-30T01:41:42+5:30
कालच दहावीच्या सीबीएसईचा निकालही जाहीर झाला आहे, त्यामुळे विद्यार्थी दहावी आणि बारावीनंतर शिक्षणाचे इच्छुक पर्याय शोधत आहेत;
पुणे : यंदाच्या शैक्षणिक वर्षातील बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे. त्यापाठोपाठ कालच दहावीच्या सीबीएसईचा निकालही जाहीर झाला आहे, त्यामुळे विद्यार्थी दहावी आणि बारावीनंतर शिक्षणाचे इच्छुक पर्याय शोधत आहेत; तसेच आपल्या पाल्याने कोणता कोर्स करावा, दर्जेदार शिक्षण देणारी संस्था कोणती, सर्व शैक्षणिक संस्थांची माहिती घेण्यासाठी किती फिरावे लागणार, वर्षाला किती फी भरावी लागेल, अनुदान मिळेल काय, असे एक ना अनेक प्रश्न सध्या पालकांना भंडावून सोडत असतील; मात्र आता आपल्या पाल्याच्या करिअरची चिंता करणे सोडा. कारण, खास आपल्यासाठी ‘लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर’चे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने सर्व नामांकित शैक्षणिक संस्थांची इत्थंभूत माहिती एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. या उपक्रमाद्वारे व्यावसायिकांनाही हजारो विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचता येणार आहे. शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या ‘लोकमत समूहा’तर्फे यंदाही अॅस्पायर एज्युकेशन फेअर; अर्थात भव्य शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन ३ ते ५ जून दरम्यान पंडित फार्मस, म्हात्रे पूल जवळ, कर्वेनगर येथे होणार आहे. पालक असो वा पाल्य, दोघांच्याही मनात करिअरसाठीच्या, शिक्षणा- विषयीच्या अनेक शंका, प्रश्न असतात. त्यांचे निराकरण या प्रदर्शनात होईल. शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ या प्रदर्शनात मार्गदर्शन करतील. याशिवाय महाविद्यालये, शाळा, मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्टचरपासून फॅशन, ग्राफि क्स, इंटिरियर डिझाइनपर्यंत व रिटेल, आयटीआय, एव्हिएशनपासून मीडिया, अॅनिमेशन, गेमिंगपर्यंत; तसेच विविध विद्यापीठे, प्रोफेशनल क्लासेस, आयटीआय, हॉटेल मॅनेजमेंट, फॉरेन लँग्वेजेस, पॉलिटेक्निकल, स्पोकन इंग्लिश, लॉ कॉलेज, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, कॅपिटल मार्केट या सर्व इन्स्टिट्यूट प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. एकाच ठिकाणी शैक्षणिक माहितीचा खजिना उपलब्ध होणार असल्याने ग्राहकांचा वेळ व पैसा वाचणार आहे. व्यवसायवाढीसाठी हे प्रदर्शन म्हणजे सुवर्णसंधी ठरणार आहे. कारण, एकाच छताखाली हजारो विद्यार्थी व पालकांपर्यंत आपल्या शैक्षणिक संस्थेची माहिती पोहोचविता येणार आहे. प्रत्येकाशी वैयक्तिक रीत्या संवाद साधून आपल्या उपक्रमाची माहिती देता येईल. यानिमित्ताने नवा वर्ग आपल्या संस्थेशी जोडला जाईल.
यामध्ये निवडक स्टॉल शिल्लक असून, आपल्या शैक्षणिक संस्थेचा स्टॉल बुक करण्यासाठी कृपया माधव रानडे नं. ९८२२६९७८०८ या क्रमांकावर संपर्क साधावा. या उपक्रमाचे दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड व के. जे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट हे असोसिएट पार्टनर आहेत. (प्रतिनिधी)
१४ जिल्ह्यांत भरणार प्रदर्शन
‘लोक मत अॅस्पायर एज्युके शन फेअर २०१६’ हे राज्यस्तरीय प्रदर्शन १४ जिल्ह्यांमध्ये भरविण्यात येणार आहे. यात औरंगाबाद, अहमदनगर, गोवा, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, लातूर, जळगाव, नागपूर, सांगली, अकोला, अमरावती, नागपूरचा समावेश आहे.
भेटवस्तू देणार
प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांपैकी एका भाग्यवंताला दर तासाला आकर्षक भेटवस्तू दिली जाईल.
विविध सेमिनारचे आयोजन
प्रदर्शनामध्ये विविध विषयांवरील तज्ज्ञ व्यक्तींकडून शैक्षणिक संधींचे विनामूल्य सेमिनारचे आयोजन करण्यात येणार आहे.