अर्थसंकल्पाच्या तयारीत आता जनतेचा सहभाग

By admin | Published: December 3, 2015 12:54 AM2015-12-03T00:54:35+5:302015-12-03T00:54:35+5:30

राज्याचा महसुली खर्च कमी करणे अथवा उत्पन्न वाढविण्याबाबत सामान्य माणसाकडे बरेचदा चांगल्या कल्पना असतात; मात्र अर्थसंकल्प तयार करणे हे प्रशासकीय काम

People's participation in the budget is now ready | अर्थसंकल्पाच्या तयारीत आता जनतेचा सहभाग

अर्थसंकल्पाच्या तयारीत आता जनतेचा सहभाग

Next

मुंबई : राज्याचा महसुली खर्च कमी करणे अथवा उत्पन्न वाढविण्याबाबत सामान्य माणसाकडे बरेचदा चांगल्या कल्पना असतात; मात्र अर्थसंकल्प तयार करणे हे प्रशासकीय काम असल्यामुळे सामान्यांना त्यासाठी सूचना करणे शक्य नसते. त्या अनुषंगाने अर्थसंकल्पाच्या तयारीत जनतेच्या सूचना, कल्पना मागविण्याचा निर्णय राज्य शासनाच्या वित्त विभागाने घेतला असून, जनतेकडून आलेल्या उत्कृष्ट सूचनांना शासनातर्फे बक्षीसही देण्यात येईल.
राज्याचा अर्थसंकल्प तयार करताना राज्याच्या उत्पन्नाचे नवे स्रोत, त्याचप्रमाणे प्रशासनातील खर्चामध्ये बचतीच्या अभिनव योजना सुचविण्यासाठी आर्थिक बाबींशी निगडित तज्ज्ञ व्यक्ती, शासकीय अधिकारी, कर्मचारी व सामान्य जनतेचा सहभाग वाढावा, या दृष्टिकोनातून त्यांच्याकडून नावीन्यपूर्ण सूचना मागविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने सर्वोत्कृष्ट सूचनांना प्रशस्तिपत्रासह रोख स्वरूपात बक्षिसे देण्याचा निर्णयही वित्त विभागाने घेतला आहे.
सूचना पाठविण्याची पद्धत
लोकांना आपल्या सूचना पत्रस्वरूपात पाठवता येतील. ही सूचनापत्रे वित्त मंत्री वा अपर मुख्य सचिव (वित्त) यांच्या नावे वित्त विभाग, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई या पत्त्यावर पाठवावीत. याशिवाय ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर आॅनलाइन सहभागी होता येईल. सूचना पाठविणाऱ्यांनी पत्रावर किंवा लिफाफ्यावर ‘अर्थसंकल्पाच्या तयारीसाठी सूचना’ असे ठळकपणे लिहावे. सदर सूचना ३१ डिसेंबरपर्यंत पाठविणे क्रमप्राप्त आहे. (प्रतिनिधी)

समिती गठित
लोकांनी शासनास पाठविलेल्या सूचना संबंधित विभागाकडे पाठविण्यात येतील. संबंधित विभागामार्फत निवडलेल्या व सचिवस्तरावरील अभियाप्रायास आलेल्या सूचनांवर अभ्यास करण्यासाठी वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली आहे.
सदर समिती प्राप्त सूचनांची छाननी करेल व बक्षीसपात्र सूचनांचा क्रम ठरवेल.

राज्याचा अथर्संकल्प तयार करण्यासाठीच्या सर्वोत्कृष्ट सूचनांना प्रशस्तिपत्रासह रोख स्वरूपात बक्षिसे देण्याचा निर्णय वित्त विभागाने घेतला आहे.

बक्षिसांचे स्वरूप
- सर्वोत्कृष्ट प्रथम सूचना-१० लाख रुपये
- सर्वोत्कृष्ट द्वितीय सूचना-७.५० लाख रुपये
- सर्वोत्कृष्ट २५ सूचना -प्रत्येकी १ लाख रुपये

Web Title: People's participation in the budget is now ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.