‘पाणी’दार राज्यासाठी जनसहभाग महत्त्वाचा - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 04:26 AM2017-08-07T04:26:29+5:302017-08-07T04:27:21+5:30

जल, जमीन आणि जंगलांचे संवर्धन झाल्यास शेतकºयांना कर्जमाफीची आवश्यकता भासणार नाही. यामधून राज्य सुजलाम, सुफलाम होईल. राज्य ‘पाणी’दार करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता असून जनसहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केले.

People's participation is important for 'water' state - Chief Minister | ‘पाणी’दार राज्यासाठी जनसहभाग महत्त्वाचा - मुख्यमंत्री

‘पाणी’दार राज्यासाठी जनसहभाग महत्त्वाचा - मुख्यमंत्री

Next

पुणे : जल, जमीन आणि जंगलांचे संवर्धन झाल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवश्यकता भासणार नाही. यामधून राज्य सुजलाम, सुफलाम होईल. राज्य ‘पाणी’दार करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता असून जनसहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केले.
‘पानी फाउंडेशन’च्या वतीने आयोजित ‘सत्यमेव जयते वॉटर कप २०१७’ स्पर्धचा पारितोषिक वितरण समारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बालेवाडी येथील श्री छत्रपती क्रीडा संकुलामध्ये झाला. अभिनेता शाहरूख खान, जलसंधारणमंत्री राम शिंदे, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, पानी फाऊंडेशनचे सत्यजित भटकळ, रिलायन्स फाऊंडेशनच्या प्रमुख नीता अंबानी, जमनादेवी बजाज ट्रस्टचे राजीव बजाज, टाटा ट्रस्टचे आर. वेंकट, पिरामल फाऊंडेशनचे अजय पिरामल, एचडीएफडीसीच्या झिया लालकाका, मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीणसिंह परदेशी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, राज्य शासनाने ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शेती’वर भर दिला असून सरकारी योजना या जनतेच्या योजना झाल्याशिवाय यशस्वी होत नाहीत. जलसंवर्धनासारखे कोणतेही मोठे काम नाही. पानी फाऊंडेशनचे काम मोठे असून राज्य शासन या उपक्रमाच्या पाठिशी आहे. एका व्यक्तीने मनात आणल्यानंतर काय होऊ शकते, हे आमिर खानने दाखवून दिले आहे. जनतेनेही त्यांची ताकद या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवून दिली.
‘पानी फाऊंडेशन’चे काम असेच सुरू राहिले तर दोन वर्षांत म्हणजे २०१९पर्यंत महाराष्ट्र जलयुक्त दिसेल. सरकारच्या वतीने स्पर्धकांना साडेसहा कोटींची बक्षीसे जाहीर केली आहेत, असेही फडणवीस म्हणाले
शाहरुख खान म्हणाला, पानी फाऊंडेशनने हा विचार कृतीतून सत्यात उतरविला आहे. यामध्ये खरे यश शेतकºयांचे असून त्यांच्या मेहनतीचेच हे फळ आहे. नीता अंबानी म्हणाल्या, आमिरने सुरू केलेली मोहीम आता लोकचळवळ झाली आहे.
पंचमहाभूते निसर्गाचे महत्त्वाचे घटक आहेत. पाणी आपले भेदभाव न करता संगोपन करीत असते.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना आमिर म्हणाला, एवढ्या गावांतून लोक आल्याचा आनंद आहे. हे सगळे काम तुमच्या मेहनतीचे फळ आहे. पानी फाऊंडेशनचे सत्यजित भटकळ म्हणाले, आपण सर्वांनी मिळून दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे धाडसी स्वप्न पाहिले आहे. त्यासाठी लोकांची वज्रमूठ करावी लागेल.

वर्ध्यातील कक्कडदरा पहिल्या बक्षिसाचे मानकरी
वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील कक्कडदरा गाव प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरून त्यांनी जलकरंडक पटकावला. गावाला ५० लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. तर ३० लाखांचा द्वितीय क्रमांक सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील भोसरे आणि बीड जिल्ह्याच्या धारुर तालुक्यातील जायभायेवाडी या गावांना विभागून देण्यात आला. माण (जि. सातारा) तालुक्यातील बिदाल आणि केज
(जि. बीड) तालुक्यातील पळसखेडा या गावांना २० लाख रुपयांचे तिसºया क्रमांकाचे बक्षीस विभागून देण्यात आले.

Web Title: People's participation is important for 'water' state - Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.