गर्भपाताचा टक्का वाढतोय, प्रसूतिदरम्यान असणा-या धोक्यामुळे गर्भपाताची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 01:30 AM2017-12-29T01:30:05+5:302017-12-29T01:30:15+5:30

पुणे : मातेच्या जिवाला अथवा आरोग्याला असणारा गंभीर धोका, अर्भकातील व्यंग अशा विविध कारणांमुळे गर्भपाताच्या आकड्यात वाढ होत असून, गेल्या पाच वर्षांत हा टक्का १५ वरून ३०वर पोहोचला असल्याची माहिती समोर आली आहे.

The percentage of miscarriage is increasing, miscarriage due to maternal mortality | गर्भपाताचा टक्का वाढतोय, प्रसूतिदरम्यान असणा-या धोक्यामुळे गर्भपाताची वेळ

गर्भपाताचा टक्का वाढतोय, प्रसूतिदरम्यान असणा-या धोक्यामुळे गर्भपाताची वेळ

Next

विशाल शिर्के
पुणे : मातेच्या जिवाला अथवा आरोग्याला असणारा गंभीर धोका, अर्भकातील व्यंग अशा विविध कारणांमुळे गर्भपाताच्या आकड्यात वाढ होत असून, गेल्या पाच वर्षांत हा टक्का १५ वरून ३०वर पोहोचला असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी (२०१६-१७) शहरात सरकारी रुग्णालयांत २६ हजार ४०२, तर खासगी रुग्णालयात २४ हजार २९८ अशा ५० हजार ७०० प्रसूती झाल्या होत्या. याच काळात १८ हजार ६०५ गर्भपाताची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे झाली आहे. यातील १२ हजार ९३४ गर्भपात हे गर्भ नको असल्यामुळे झाले आहेत. मातेच्या जीवितीला अथवा आरोग्याला असलेला धोका, जन्माला आल्यानंतर मुलामध्ये असलेला संभाव्य धोका, बलात्कारामुळे गर्भधारणा झाल्यास गर्भपाताची वेळ आली आहे. शहरात होणाºया एकूण गर्भपाताच्या आकड्याशी तुलना केल्यास हा टक्का तब्बल ३० टक्के इतका भरतो.
शहरात २०१३-१४ मध्ये १८ हजार ३७४ गर्भपाताच्या घटना घडल्या होत्या. त्यापैकी १५ हजार ७८३ गर्भपात गर्भ नको असल्याने झाले होते, तर २५९१ गर्भपात अर्भकातील व्यंग, मातेच्या जिवाला अथवा आरोग्याला असणारा धोका यामुळे झालेले होते. म्हणजेच अवघ्या चार वर्षांत धोक्यातील हे प्रमाण दुप्पट झाल्याचे दिसून येत आहे.
शहरात १६० गर्भपात केंद्रांना १२ आठवड्यापर्यंत, तर १८३ केंद्रांना २० आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्याची परवानगी आहे. एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ दरम्यान बारा आठवड्यांपर्यंतचे १७ हजार ९५८, तर २० आठवड्यापर्यंतचे ६४७ गर्भपात करण्यात आले आहेत, माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांनी ही आकडेवारी समोर आणली आहे.
याबाबत माहिती देताना प्रसूतिरोगतज्ज्ञ वैजयंती पटवर्धन म्हणाल्या, गर्भाचे ठोके पाचव्या आठवड्यात समजू शकतात. मात्र, गर्भाचे सर्व अवयव विकसित व्हायला १६ ते १७ आठवड्यांचा कालावधी लागतो. गर्भाच्या मेंदूचा विकास झाला नसेल, अर्भकाला व्यंगत्व असेल, मेंदूत पाणी असेल अशा गंभीर स्थितीत गर्भपाताचा सल्ला दिला जातो. जिवाला धोका असल्यासही गर्भपात करण्यास सांगितले जाते. हा टक्का साधारण २०च्या आसपास असेल. गर्भ नको असल्याने गर्भपात करणाºयांची संख्या अधिक आहे. गर्भपाताच्या संख्येला अनेक सामाजिक बाजूदेखील आहेत.
।‘पीसीपीएनडीटी’च्या
चार वर्षांत ४ तक्रारी
गर्भलिंगनिदान कायद्यानुसार (पीसीपीएनडीटी) महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे २०१४ ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत १८००२३३६०९९ या टोल फ्री क्रमांकावर अवघ्या ४ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यातील दोन तक्रारी या २०१४मधील आहेत. पीसीएनडीटी कायद्यानुसार २०१३ नंतर एकाही गर्भनिदान केंद्राचा परवाना रद्द करण्यात आलेला नाही.
।गर्भपाताची कारणे २०१३-१४ २०१४-१५ २०१५-१६ २०१६-१७ एप्रिल ते आॅगस्ट २०१७
मातेला जीवघेणा धोका ९३२ १७७७ १८२३ २५९६ ६९०
मानसिक आरोग्याला धोका १००० ९५७ ५६१ १६३४ ४०२
जीवितास धोका २४१ ५६० ६२३ १९१ ११८
बाळाच्या जीवितास धोका ३९४ ४२० ५८९ १२१० १६९

Web Title: The percentage of miscarriage is increasing, miscarriage due to maternal mortality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.