आयआयटीत संशोधनाचा टक्का वाढला

By admin | Published: August 11, 2014 03:33 AM2014-08-11T03:33:49+5:302014-08-11T03:33:49+5:30

देशभरातील विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांमधील संशोधनाचा टक्का घसरत असल्याची खंत व्यक्त होत असतानाच आयआयटी मुंबईने मात्र संशोधनात आघाडी घेतली आहे

The percentage of research in IIT increased | आयआयटीत संशोधनाचा टक्का वाढला

आयआयटीत संशोधनाचा टक्का वाढला

Next

मुंबई : देशभरातील विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांमधील संशोधनाचा टक्का घसरत असल्याची खंत व्यक्त होत असतानाच आयआयटी मुंबईने मात्र संशोधनात आघाडी घेतली आहे. आयआयटीमध्ये गेल्या पाच वर्षांत संशोधनाचा टक्का तब्बल २४ टक्क्यांनी वाढल्याचे, आयआयटी मुंबईचे संचालक देवांग खक्कर यांनी सांगितले.
दशकभरापूर्वी संस्थेत होत असलेल्या संशोधनाच्या तुलनेत गेल्या पाच वर्षांपासून संशोधनाने जोर पकडला असून, संस्थेत असलेल्या जवळपास सर्वच विभागांतून विविध विषयांवर संशोधन सुरू आहे. मूलभूत संशोधन करतानाच समाजाच्या उपयुक्त अंगाने त्यावर भर देण्याच्या हेतूमधून हे संशोधन होत असल्याने आगामी काळात अनेक आविष्कार उपलब्ध होण्याच्या मार्गावर आहेत. संशोधनाकरिता पायाभूत सुविधांसोबतच आवश्यकता असते ती, निधीच्या उपलब्धतेची. २०१३ - १४ या शैक्षणिक वर्षात २१५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. २०१२-१३ या शैक्षणिक वर्षाच्या तुलनेत हा आकडा कमी आहे.
मात्र केंद्र सरकारच्या एनएमई - आयसीटी या उपक्रमांतर्गत २०१२-१३मध्ये आयआयटीला मोठी मदत मिळाली होती. २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात सायन्स, इंजिनीअरिंग, मॅनेजमेंट आणि सोशल सायन्स या विषयांवरील संशोधनाला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे खक्कर म्हणाले. खासगी प्रकल्प आणि शासनाकडून एकूण २१५.५२ कोटींचे अनुदान मिळाल्याचेही खक्कर यांनी दीक्षान्त समारंभात सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.

Web Title: The percentage of research in IIT increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.