सोशल मीडियामुळे मतदानाचा टक्का वाढला
By admin | Published: February 22, 2017 04:57 AM2017-02-22T04:57:56+5:302017-02-22T04:57:56+5:30
राज्य निवडणुक आयोगाने मतदारांना जागरुक करण्यासाठी केलेल्या ट्रू वोटर अॅप, कॉप अॅप आणि मिस कॉलद्वारे
मुंबई : राज्य निवडणुक आयोगाने मतदारांना जागरुक करण्यासाठी केलेल्या ट्रू वोटर अॅप, कॉप अॅप आणि मिस कॉलद्वारे मतदारांना प्रतिज्ञेचे आवाहन करणाऱ्या विविध कॅम्पेन्सला मतदारांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. परिणीमी, या जनजागृतीपर मोहिम आणि अभियानांचे प्रतिबिंब म्हणूनच मुंबईसह राज्यभरात मतदानाचा टक्का वाढल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे.
निवडणुकांसाठी आयोगाने विविध प्रकारे जनजागृतीपर कार्य हाती घेतले. त्यात ट्रू वोटर अॅप, कॉप अॅप, चॅट बॉट आणि मिस कॉल प्रतिज्ञेला मतदारांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला दिसून येतो आहे. त्यात ट्रू वोटर हे अॅप तब्बल १ लाख ३५ हजार मतदारांनी डाऊनलोड केले आहे. तर यादीत नाव, प्रभाग व मतदान केंद्रांचा शोध ९ लाख मतदारांनी घेतला आहे. मतदान केंद्रांवर पोहोचण्यासाठी मार्गक्रमण करण्यासाठी ९८ हजार मतदारांनी या अॅपची मदत घेतली आहे. तर प्रभागातील उमेदवारांची माहिती पाहणाऱ्यांची संख्या ४५ हजार इतकी आहे. तर जवळपास २२ हजार २७० अधिकाऱ्यांनी यावर नोंदणी
केली. (प्रतिनिधी)