दोषी ठेकेदार कायमस्वरूपी हद्दपार

By admin | Published: May 19, 2016 05:11 AM2016-05-19T05:11:57+5:302016-05-19T05:11:57+5:30

नालेसफाई आणि रस्ते दुरुस्तीचा घोटाळा उघड झाल्यानंतर ठेकेदारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पालिकेने निविदेच्या अटींमध्येच बदल केला आहे़

Permanent exile of guilty contractor | दोषी ठेकेदार कायमस्वरूपी हद्दपार

दोषी ठेकेदार कायमस्वरूपी हद्दपार

Next


मुंबई : नालेसफाई आणि रस्ते दुरुस्तीचा घोटाळा उघड झाल्यानंतर ठेकेदारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पालिकेने निविदेच्या अटींमध्येच बदल केला आहे़ त्यानुसार, दोषी ठेकेदारांची नोंदणी आता कायमस्वरूपी रद्द होणार आहे़ तसेच प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्याचे छायाचित्र जीओ टॅगिंगसह पालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे़
गेल्या वर्षभरात पालिकेचा कारभार चव्हाट्यावर आणणारे नालेसफाई व रस्ते घोटाळ्यांच्या चौकशी निविदा प्रक्रियेतच त्रुटी असल्याचे आढळून आले़ ठरावीक ठेकेदारांनाच कंत्राट मिळण्यासाठी वरिष्ठ पातळींवरूनच निविदेतील अटी बदलण्यात आल्या असल्याचे रस्ते घोटाळ्याच्या चौकशीतून उजेडात आले होते़ मात्र अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची तरतूदच निविदेत नाही़ त्यामुळे घोटाळेबाज ठेकेदार थातूरमातूर कारवाईनंतर पुन्हा निविदा प्रक्रियेत सामील होऊन नवीन कंत्राट मिळवीत आहेत़ नालेसफाई घोटाळ्यातील जबाबदार ठेकेदारांनी पालिकेच्या कारवाईवर न्यायालयातून स्थगिती आणली होती़ या घटनेनंतर पालिका आयुक्त अजय मेहता यांनी ठेकेदारांना मदत करणाऱ्या अटी बदलण्यासाठी समिती नेमली
होती़ (प्रतिनिधी)
>अशा आहेत
समितीच्या शिफारशी...
उपायुक्त चंद्रशेखर चौरे यांच्या समितीने निविदा प्रक्रियेसाठी नियमावलीच तयार केली आहे़ त्यानुसार दोषी ठेकेदाराची नोंदणी कायमस्वरूपी रद्द करण्याची शिफारस करण्यात आली आहे़ तसेच ठेकेदारांमध्ये स्पर्धा वाढविण्यासाठी काही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत़
प्रकल्पाची माहिती जगजाहीर होणार
एखाद्या कामासाठी निविदा मागविल्यानंतर तेथील सध्याची परस्थिती, काम सुरू असताना प्रत्येक टप्प्याचे छायाचित्र आणि काम संपल्यानंतर त्याचे छायाचित्र पालिकेच्या संकेतस्थळावरून जाहीर होणार आहे़ या छायाचित्रांसह प्रकल्पाची संपूर्ण माहितीही संकेतस्थळावर असेल़

Web Title: Permanent exile of guilty contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.