सेवानिवृत्तांना मिळणार कायमस्वरूपी ओळखपत्र
By admin | Published: March 3, 2017 06:06 AM2017-03-03T06:06:05+5:302017-03-03T06:06:05+5:30
पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत ते पद नमूद करून तसेच त्याआधी ‘सेवानिवृत्त’ असा उल्लेख करून त्यांना कायमस्वरूपी ओळखपत्र देण्यात येणार आहे
मुंबई : शासकीय अधिकारी व कर्मचारी ज्या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत ते पद नमूद करून तसेच त्याआधी ‘सेवानिवृत्त’ असा उल्लेख करून त्यांना कायमस्वरूपी ओळखपत्र देण्यात येणार आहे. तसा आदेश आज सामान्य प्रशासन विभागाने काढला आहे. यापूर्वी सेवानिवृत्तांना ओळखपत्र कायमस्वरूपी मिळावे, अशी मागणी होती. शासनाने ती मान्य केली. सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. या ओळखपत्रामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर निवृत्तिवेतनाबाबतची कार्यवाही वेळेत पूर्ण होणे तसेच शासकीय रुग्णालयातील औषधोपचार, ज्येष्ठ नागरिक म्हणून रेल्वे, बँका इत्यादी ठिकाणी उपयोग करण्यासाठी होईल. (विशेष प्रतिनिधी)