गणेशोत्सवात शेवटचे पाच दिवस स्पिकर सुरु ठेवण्याची परवानगी
By Admin | Published: August 16, 2016 08:39 PM2016-08-16T20:39:17+5:302016-08-16T20:39:17+5:30
गणेश उत्सवाच्या काळात शेवटचे पाच दिवस रात्री उशीरा पर्यंत स्पिकर सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 16 - गणेश उत्सवाच्या काळात शेवटचे पाच दिवस रात्री उशीरा पर्यंत स्पिकर सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये जिल्हाधिका-यांनी आपल्या अधिकारात एक दिवस दिला असून, जिल्हाधिका-यांना हा अधिकार वापरता येणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. याबाबत येत्या २२ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मुंबईत बैठक होणार असून, त्यानंतरच पाच दिवसांबाबत अतिम निर्णय होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.
न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री दहा नंतर स्पिकर, ढोल-ताशे वाजविण्यास बंदी आहे. परंतु यामध्ये न्यायालयाने सणा-सुदीच्या काळात वर्षांतील केवळ १५ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत स्पिकर सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. हे दिवस ठरविण्याचे अधिकारी न्यायालयाने राज्य शासनाला दिले. त्यानुसार राज्य शासनाने १२ दिवस स्व:ताच्या अधिकारामध्ये निश्चित केले असून, स्थानिक परस्थितीनुसार निर्णय घेण्यासाठी ३ दिवस संबंधित जिल्हाधिका-यांना हे अधिकार दिले आहेत. त्यानुसार पुण्याच्या जिल्हाधिका-यांनी गणेश उत्सवाच्या काळात आपल्या अधिकारातील एक दिवस रात्री बारा वाजेपर्यंत स्पिकर सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे.
जिल्हाधिका-यांच्या निर्णयानुसार आता १०, ११,१२, १३ आणि १५ सप्टेंबर असे पाच दिवस रात्री १२ वाजेपर्यंत स्पिकर सुरु ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये १२ सप्टेंबर ही जिल्हाधिका-यांनी निश्चित केली आहे. परंतु याबाबत न्यायालयाने जिल्हाधिका-यांना हे अधिकार वापरता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत राव यांनी सांगितले की, येत्या २२ आॅगस्ट रोजी मुंबईत पुणे, ठाणे आणि मुंबईतील गणेश मंडळाच्या प्रतिनिधीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्येच जिल्हाधिका-यांच्या अधिकारा बाबत अंतिम निर्णय होईल.
सीसीटीव्ही बंदचा अहवाल मागविणार
शहराच्या सुरक्षितेसाठी शासनाच्या वतीने एक हजार पेक्षा अधिक सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.पंरतु यापैकी अनेक सीसीटीव्ही सध्या बंद पडले असल्याची स्थिती आहे. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात बसविण्यात आलेले सीसीटीव्ही आणि त्यांची स्थिती, किती बंद पडले आहेत याबाबत सविस्तर अहवाल मागविणार असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी स्पष्ट केले.