धार्मिक संस्थांच्या दानपेटीतील जुन्या नोटा बँकेत भरण्यास परवानगी

By admin | Published: December 29, 2016 05:17 PM2016-12-29T17:17:26+5:302016-12-29T17:17:26+5:30

महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने आज परिपत्रक काढून धार्मिक संस्थाच्या दानपेटीतील जुन्या 500/1000 च्या नोटा उद्या 30 डिसेंबर रोजी बँकेत भरण्यास परवानगी दिली

Permission to fill the old banknote bank in the donor's bank account | धार्मिक संस्थांच्या दानपेटीतील जुन्या नोटा बँकेत भरण्यास परवानगी

धार्मिक संस्थांच्या दानपेटीतील जुन्या नोटा बँकेत भरण्यास परवानगी

Next

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 29 - धार्मिक संस्थाच्या दानपेटीतील जुन्या 500/1000च्या नोटा बँकेत भरू नये, असे धर्मादाय आयुक्तांचे 2 डिसेंबर 2016चे आदेश होते. तथापि 30 डिसेंबरपर्यंतच बँका या नोटांचा भरणा करून घेणार होत्या. नोट भरणा करण्यावरची बंदी तातडीने उठवली नसती तर महाराष्ट्रातील सर्व धार्मिक ट्रस्टचे कोटी रुपये नुक़सान झाले असते.
त्याबद्दल श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी व कै. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त युवराज गाडवे यांनी सहधर्मादाय आयुक्त शिवाजीराव कचरे यांना निवेदन दिले होते. त्या निवेदनाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने आज परिपत्रक काढून धार्मिक संस्थाच्या दानपेटीतील जुन्या 500/1000 च्या नोटा उद्या 30 डिसेंबर रोजी बँकेत भरण्यास परवानगी दिली आहे, अँड. शिवराज कदम जहागिरदार यांनी सांगितले.

Web Title: Permission to fill the old banknote bank in the donor's bank account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.