भुजबळांच्या खुल्या चौकशीला परवानगी

By admin | Published: February 24, 2015 04:40 AM2015-02-24T04:40:53+5:302015-02-24T04:40:53+5:30

राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी गोळा केलेल्या सुमारे अडीच हजार कोटी रुपयांच्या कथित बेहिशेबी मालमत्तेची खुली चौकशी करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Permission for open inquiry of Bhujbal | भुजबळांच्या खुल्या चौकशीला परवानगी

भुजबळांच्या खुल्या चौकशीला परवानगी

Next

यदु जोशी, मुंबई
राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी गोळा केलेल्या सुमारे अडीच हजार कोटी रुपयांच्या कथित बेहिशेबी मालमत्तेची खुली चौकशी करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) परवानगी दिली. महाराष्ट्र सदन बांधकामाचे कंत्राट देण्याच्या मोबदल्यात स्वत:च्या खासगी कंपन्यांना लाभ मिळवून दिल्याबद्दल, भुजबळ कुटुंबीयांची चौकशी यापूर्वीच सुरू झाली आहे. त्यामुळे या दोन्ही चौकशींतून नेमके काय निष्पन्न होते, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.
आम आदमी पार्टीच्या नेत्या अंजली दमानिया यांनी एसीबीकडे भुजबळ यांच्या बेहिशेबी मालमत्तेबाबत तक्रार दाखल केली होती. भुजबळ यांची कुठे आणि किती संपत्ती आहे याचा तपशीलही दिला होता.
स्वत: भुजबळ, त्यांच्या पत्नी मीना, मुलगा पंकज, पुतण्या समीर भुजबळ आदींच्या नावे असलेली कोट्यवधी रुपये किमतीची संपत्ती, त्यांच्याकडे असलेल्या गाड्या, सोने-चांदी, हिरे, बंगले, फ्लॅटस्, शेतजमिनी, भुजबळ कुटुंबाच्या मालकीच्या असलेल्या कंपन्या यांची विस्तृत माहिती तक्रारीत देण्यात आली आहे.

Web Title: Permission for open inquiry of Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.