मगरीच्या पाठीवर बसून सेल्फी काढणाऱ्या तरुणाला अटक !
By admin | Published: July 20, 2016 07:27 PM2016-07-20T19:27:13+5:302016-07-20T19:42:13+5:30
कण्हेर धरणाच्या भिंतीवर सापडलेल्या मगरीच्या पाठीवर बसून सेल्फी काढल्याप्रकरणी एका तरुणाला वन खात्याने बुधवारी अटक केली. विजय विठ्ठल भगळे (वय 34, रा. कण्हेर, ता सातारा) असे
'लोकमत ऑनलाईन'चा व्हिडीओ ठरला वनखात्यासाठी पुरावा..
सातारा, दि.20 - कण्हेर धरणाच्या भिंतीवर सापडलेल्या मगरीच्या पाठीवर बसून सेल्फी काढल्याप्रकरणी एका तरुणाला वन खात्याने बुधवारी अटक केली. विजय विठ्ठल भगळे (वय 34, रा. कण्हेर, ता सातारा) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या विकृत घटनेचे छायाचित्र आणि व्हिडीओ सर्वप्रथम 'लोकमत ऑनलाईन' झळकताच सरकारी यंत्रणा तातडीने हलली होती.
विजय भगळे याला सातारा जिल्हा न्यायालयासमोर हजर केले असता २३ जुलैपर्यत वनकोठडी देण्यात आली. वन्यजीव अधिनियम १९७२ कलम ९ अन्वये ही कारवाई करण्यात आली. जिल्हा उपवनसंरक्षक अनिल अंजनकर सहायक वन संरक्षक ए. एल. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल महेश पाटील, वनपाल जी. एस. भोसले, वनरक्षक मारूती माने, दिपक गायकवाड, प्रशांत पडवळ, कृष्णा पवार यांनी ही कारवाई केली.