पर्सनलाइज्ड गिफ्टिंगचा नवउद्योग !

By admin | Published: April 8, 2017 11:21 PM2017-04-08T23:21:37+5:302017-04-08T23:21:37+5:30

प्रोजेक्ट ... मग तो शाळेचा असो वा कॉलेजचा सगळे केवळ ‘सबमिशन’ करण्यासाठी धडपड करत असतात, पण पुण्याच्या सिम्बॉयसिस स्कूल फॉर लिबरल आर्ट्समध्ये

Personalized Gifting New Industry! | पर्सनलाइज्ड गिफ्टिंगचा नवउद्योग !

पर्सनलाइज्ड गिफ्टिंगचा नवउद्योग !

Next

- स्नेहा मोरे

प्रोजेक्ट ... मग तो शाळेचा असो वा कॉलेजचा सगळे केवळ ‘सबमिशन’ करण्यासाठी धडपड करत असतात, पण पुण्याच्या सिम्बॉयसिस स्कूल फॉर लिबरल आर्ट्समध्ये तृतीय वर्षाचे शिक्षण घेत असताना, हाच प्रोजेक्ट सीरिअसली घेतला आणि मग जमीर इफ्तेखारी या विद्यार्थ्याच्या संकल्पनेतून ‘6ixi Arts’  हा पर्सनलाइज्ड गिफ्टिंगचा नवउद्योग प्रत्यक्षात साकारला.
कॉलेजमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने घरातून पाच हजार रुपये आणून, त्यातून तीन महिने प्रायोगिक तत्त्वावर उद्योग करायचा होता. त्यानंतर, त्याचे सादरीकरण करायचे होते. प्रोजेक्ट दिल्यानंतर बाकीच्या विद्यार्थ्यांनी रेडिमेड टीशर्ट्स आणि तत्सम वस्तू बाजारातून आणून विकायला सुरुवात केली, पण मला मात्र, काहीतरी वेगळे करायचे होते. बराच काळ विचार केल्यानंतर, त्यांना या पर्सनलाइज्ड गिफ्टिंगची कल्पना सुचली, असे जमीरने सांगितले. या वेगळ््या आणि हटके उद्योगाविषयी सांगताना जमीर म्हणाला की, छोट्याशा पेन आणि कीचेन्सपासून कार, बाइक्सपर्यंत प्रत्येक वस्तू ग्राहकाला हवी तशी वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने आम्ही कस्टमाइज्ड करतो. केवळ एका वर्षात आॅनलाइन बाजारपेठांतील प्रसिद्ध पोर्ट्ल्सने आम्हाला टायअपसाठी विचारणा केली आहे, त्यामुळे
आता आमची जबाबदारी वाढली असून, सध्या महाराष्ट्रातील मेट्रो शहरांसह बंगळूरमध्ये आम्ही पोहोचलो आहोत.
माझ्या मित्रांमध्ये अनेक चांगली कौशल्ये आहेत. मात्र, त्यांना योग्य ते व्यासपीठ मिळत नव्हते. त्यांच्यात खूप चांगल्या क्षमता आहेत आणि त्या दाखवण्याकरिता एका व्यासपीठाची आवश्यकता होती. मी व्यवसायाची कल्पना त्यांना सांगताच त्यांनीदेखील मला समर्थन दिले आणि ‘6ixi Arts’ ची सुरुवात झाली. जमीर याच्यासोबतच त्याचा मित्र ओमकार परब हा या उद्योगाचा सह-संस्थापक आहेत. २०१६ साली या सुरुवात केली सुरुवातीच्या दिवसापासूनच हे ग्राहकांच्या पसंतीस उतरले असून, त्याला लोकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे, असे जमीरने सांगितले.
विशेष म्हणजे, भारतात इतरत्र कुठेही न मिळणारे ‘एम्बिग्राम कीचेन्स’ या आम्ही उपलब्ध करून दिल्या आहेत, ज्या संपूर्ण देशभरात कोठेही मिळत नाहीत, असे जमीर अभिमानाने सांगतो. याशिवाय पर्सनलाइज्ड लॉकेट, माउस पॅड आणि इतर गोष्टीदेखील येथे मिळतात. महाविद्यालयीन शिक्षण संपतानाच, सुरुवातीच्या दिवसांत अनेक अडचणी आल्या, तसेच या करिअरची पार्श्वभूमी नसल्याने बाराखडीपासून सुरुवात केली. व्यावसायाकरिता लागणारे सॉफ्टवेअर शिकून घेणे, भांडवल गोळा करणे, पैसा उभा करणे अशा अनेक गोष्टी रात्रीचा दिवस करून शक्य केल्यात. सध्या या उद्योगाचे काम आॅनलाइन आणि आॅफलाइन दोन्ही पद्धतींनी चालते. आॅर्डर घेतल्यानंतर ते तिचे यशस्वी वितरण करेपर्यंत ही टीम कायम ग्राहकांच्या संपर्कात असते. या उद्योगातून मिळणारा ६० टक्के नफा आम्ही शैक्षणिक कार्यासाठी वापरण्याचा मानस असल्याचे जमीरने सांगितले. या तंत्रज्ञानाच्या मदतीने फेसबुक कोणत्याही युझरला आपल्या मित्रपरिवाराच्या वाढदिवसाचे
१५ दिवसांपूर्वी रिमाइंडर मिळेल.
त्याच वेळी त्या मित्राला वाढदिवसाला गिफ्ट द्यायची इच्छा आहे का?
असेही युझरला विचारून पर्सनलाइज्ड गिफ्टिंगच्या उद्योगांच्या लिंक्स
शेअर करण्यात येतील. जेणेकरून, गिफ्टिंग सोपे व्हावे आणि सेलिब्रेशनसह तो वाढदिवस स्मरणात राहावा. भविष्यात बिग डेटा आणि हुडूप या इंटरनेट तंत्रज्ञानाचा वापर करून फेसबुकशी हातमिळवणी करून देशभरातील पर्सनलाइज्ड गिफ्टिंग उद्योगांना एकाच व्यासपीठावर आणायचे आहे, त्याची प्रक्रिया सुुरू झाली आहे. मात्र, हा मोठा पल्ला असल्याने, यासाठी वेळ जावा लागेल, असे जमीरने सांगितले.

-moresneha305@gmail.com

Web Title: Personalized Gifting New Industry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.