पेशवेकालीन परंपरा : नाशिककरांनी जोपासला रहाड रंगोत्सव

By Admin | Published: March 16, 2017 06:53 PM2017-03-16T18:53:42+5:302017-03-16T18:58:53+5:30

नाशिककरांच्या रहाड रंगोत्सवाच्या परंपरेला सुमारे तीनशे वर्षांचा इतिहास आहे. नाशिकमध्ये सध्या चार पेशवेकालीन रहाडी (मोठा भूमिगत हौद) आहेत.

Peshwedic Tradition: Raheed Rangotsav, developed by Nashikar | पेशवेकालीन परंपरा : नाशिककरांनी जोपासला रहाड रंगोत्सव

पेशवेकालीन परंपरा : नाशिककरांनी जोपासला रहाड रंगोत्सव

googlenewsNext

नाशिक : नाशिककर धूलिवंदनला रंग खेळत नाही तर होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमीच्या निमित्ताने रंगोत्सवाचा मनमुराद आनंद लुटतात. नाशिककरांच्या रहाड रंगोत्सवाच्या परंपरेला सुमारे तीनशे वर्षांचा इतिहास आहे. नाशिकमध्ये सध्या चार पेशवेकालीन रहाडी (मोठा भूमिगत हौद) आहेत. या रहाडींमध्ये नाशिककर रंगपंचमीला रंगात न्हाऊन निघतात. शहरातील तीन रहाडी खुल्या करण्यात येऊन रंगपंचमीसाठी सज्ज करण्यात आल्या आहेत.
नाशिक शहरात रंगपंचमी आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. या रंगोत्सवाचे वेगळेपण आहे ते म्हणजे रहाडीचे. पेशवेकालीन खोदलेल्या रहाडी नाशिककरांनी अजूनही जपून ठेवल्या आहेत. शहरातील जुने नाशिक गावठाण भागात या रहाडी भूमिगत आहेत. वर्षभर या रहाडींवरून रहादारी सुरू असते. रंगपंचमीच्या आदल्या दिवशी सकाळपासूनच या रहाडींच्या जागेवर विधिवत पूजन क रून रहाड खोदण्यास सुरुवात करण्यात आली होती. पंचवटीमधील शनि चौक, गोदाकाठावरील संत गाडगे महाराज पुलालगतचा दिल्ली दरवाजा परिसरात आणि जुन्या तांबट गल्लीमधील रहाडी रंगोत्सवासाठी सज्ज करण्यात आल्या आहेत. रंगपंचमीच्या पूर्वसंध्येलाच या रहाडी पूर्णपणे खुल्या करण्यात येऊन स्वच्छता करण्यात आली आहे.

नाशिकचा रंगोत्सव या रहाडींमुळे संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. नाशिककर या रहाडी पक्का रंग टाकून पाण्याने भरतात. रहाडीच्या चारही बाजूंनी युवक उभे राहून नंतर त्यामध्ये ‘सूर’ फेकतात. या सूर फेकण्याच्या पद्धतीलादेखील गमतीदार नावाने ओळखले जाते. ते नाव म्हणजे ‘धप्पा’. हा धप्पा जेव्हा एखादा युवक घेतो तेव्हा रहाडीभोवती असलेले अन्य २५ ते ५० लोक रहाडीच्या उडणाऱ्या पाण्यानेच ओलेचिंंब होतात. हा रहाड रंगोत्सव प्रसिद्ध आहे तो अशा सामूहिक रंगात रंगत अंघोळीसाठी. जो उत्तमपणे उंच उडी मारतो तोच या धप्प्याकडे इतरांचे लक्ष वेधून घेऊ शकतो. नाशिककरांनी आपली पेशवेकालीन रंगपंचमीची आगळीवेगळी पारंपरिक प्रथा आजही जोपासली आहे.

 

 

 

Web Title: Peshwedic Tradition: Raheed Rangotsav, developed by Nashikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.