कीटकनाशक घातक हत्यार!

By Admin | Published: October 17, 2015 03:09 AM2015-10-17T03:09:43+5:302015-10-17T03:09:43+5:30

पिकांवरील कीडनियंत्रणासाठी शोधली गेलेली विषारी कीटकनाशके आता हताश शेतकऱ्यांद्वारे देशभरात घातक शस्त्राच्या स्वरूपात वापरली जाऊ लागली आहेत

Pesticide Deadly Assassin! | कीटकनाशक घातक हत्यार!

कीटकनाशक घातक हत्यार!

googlenewsNext

गणेश देशमुख, अमरावती
पिकांवरील कीडनियंत्रणासाठी शोधली गेलेली विषारी कीटकनाशके आता हताश शेतकऱ्यांद्वारे
देशभरात घातक शस्त्राच्या स्वरूपात वापरली जाऊ लागली आहेत. आत्मघातासाठी सहज उपलब्ध असलेल्या या 'हत्यारा'ला मिळणारी वेगवान पसंती चिंताजनक आहे.
पद्धतीतील सोपेपणा, मृत्यूची खात्री, खिशाला पेलणारे आणि सहज उपलब्धता या बाबींमुळे आत्मघात करण्यासाठी कीटकनाशकांच्या वापरात कमालीची वाढ झाली आहे. देशभरातील सर्वच प्रकारच्या आत्महत्यांच्या पद्धतींंचे विश्लेषण करून, एनसीआरबीने जारी केलेल्या एका आकडेवारीत कीटकनाशकांच्या सेवनाने झालेल्या आत्महत्यांची टक्केवारी २९ इतकी नोंदविली आहे.
देशात आत्महत्येसाठी वापरल्या
जाणाऱ्या १४ पद्धतींपैकी कीटकनाशक प्राशन करण्याच्या पद्धतीने थेट दुसऱ्या क्रमांकावर धडक दिली आहे. आत्महत्येसाठी गळफासाच्या पद्धतीचा सर्वाधिक प्रमाणात वापर केला असून, त्याची टक्केवारी ३६ आहे. देशातील केवळ शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणांचा विचार केल्यास, कीटकनाशकांच्या वापराची क्रमवारी पहिली आहे.
या कीटकनाशकाचा अतिरेकी वापर महाराष्ट्रात सर्रास सुरू आहे. भाजीपिकांवर फवारण्यास मनाई असलेल्या या कीटकनाशकाचा वापर विदर्भ प्रांतात इतका चिंताजनकरीत्या वाढला आहे की, कृषितज्ज्ञ शेतकऱ्यांना 'मोनोलव्हर' असे संबोधू लागले आहेत. जुलै २०१३ मध्ये बिहारमधील सारन जिल्ह्यात कीटकनाशकाच्या रिकाम्या डब्यात ठेवलेल्या तेलाचा वापर अन्न शिजविताना केल्याने २३ विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले होते.पिकांवरील इवल्या-इवल्या अळ्या व सूक्ष्म किडींचा नाश करण्यासाठी सर्रास वापरण्यात येणाऱ्या कीटकनाशकांचे काही थेंबही मानवासाठी जीवघेणे ठरतात. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे मोनोक्रोटोफॉस हे कीटकनाशक अमरिकेत वापरण्यास मनाई आहे.
खोकल्याच्या औषधासाठी प्रिस्क्रिप्शन,
जहाल विषाची मात्र खुली विक्री!
खोकल्याचे सीरप खरेदी करावयाचे असेल, तर 'प्रिस्क्रिप्शन'ची सक्ती आहे. तथापि, मृत्यूचा अचूक ठाव घेणारे कीटकनाशकरूपी हत्यार सर्वत्र अनिर्बंधपणे वापरले जात आहे. अशी जहाल विषे खुल्या विक्रीपासून कशी रोखावी, हा वादाचा विषय ठरू शकतो. तथापि, किडी मारणारी, पण मनुष्य जीवनाला घातक नसलेली कृषिरसायने शोधणे हाच यावरील निश्चित उपाय ठरू शकेल.

Web Title: Pesticide Deadly Assassin!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.