गोमुत्रापासून तयार केले कीटकनाशक

By admin | Published: July 19, 2016 02:28 PM2016-07-19T14:28:43+5:302016-07-19T16:28:32+5:30

एका कृषी सहायकाने गोमुत्रापासून किटकनाशक तयार केले आहे.

Pesticides made from gooseberry | गोमुत्रापासून तयार केले कीटकनाशक

गोमुत्रापासून तयार केले कीटकनाशक

Next
शेतक-यांना मोफत पुरवठा : कृषी सहायकाचा उपक्रम
 
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. १९ -   शेतकरी पारंपारिक शेती विसरत चालला असून विविध कंपन्यांच्या प्रलोभनाला बळी पडत असल्याचे सध्या द्या चित्र आहे. असे असतांना एका कृषी सहायकाने गोमुत्रापासून किटकनाशक तयार केले आहे. हे किटकनाशक शेतक-यांना प्रयोगाखातर मोफत वाटप करीत आहेत. याचा रिझल्ट पाहता मराठवाडा, बारामतीसह इतर जिल्हयातील शेतकरी मोठया प्रमाणात याचा वापर करीत आहेत.
वाशिम तालुक्यातील गोंडेगाव येथील सुनिल गुलाबराव एकाडे यांचे बीएसस्सी अ‍ॅग्रीकल्चर शिक्षण अकोला येथील पंजाबराव कृषी विद्यापिठ येथे झाले आहे. ते वाशिम येथीलच तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषीसहायक पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी ते एका किटकनाशक कंपनीत कार्यरत असतांना त्यांच्या लक्षात आले जवळपास शेतकरी बांधव विविध कंपन्यांवर विसंबुन आहेत. जुने जाणते शेतक-यांना पीकांवर कधी कीड येणार याची कल्पना असते. तेव्हा जुने शेतकरी मी जो प्रयोग केला तोच करायचे पण साध्या पध्दतीने. हा प्रयोग शेतकरी विसरत चालल्याने याला आधुनिक रुप देण्याचा प्रयत्न केला. एकाडे यांनी गोमुत्र, शेण व निंबोळीपावडर यापासून ‘अमृत कवच’ नावाचे कीटकनाशक बनविले ज्याचा वापर केल्यास हमखास पीकांना फायदा होत असल्याचे खुद्द शेतकरी सांगताहेत. त्यांनी गांडुळखतासाठी ज्या बेडचा वापर करतात त्याच बेडचा वापर या प्रयोगासाठी केला आहे. बेडमध्ये तीनही घटक एकत्र करुन ३० ते ३५ डिग्रीसेल्सियस तापमानात हे घटक २० दिवस ठेवले. तीनही घटक एकत्र केल्यानंतर गोमुत्रामधील अमोनिया द्रव्यरुपात तयार होतो. त्यातून नत्र (नायट्रोजन) तयार होतात. यामधून येत असलेल्या उग्रवासामुळे पीकांवर किटक येत नाहीत. कडूवास यावा म्हणून यामध्ये निंबोळी पावडरचा वापर त्यासाठीच करण्यात आला आहे. कीटकनाशक पिकांवर बसू नये यासाठी लागणारे घटक या तिनही घटकात आहेत. गोमुत्रामध्ये नत्र, स्फूरद, हयुमिक अ‍ॅसिड तर निंबोळी पावडरमध्ये कडू सुगंध व कडू चव आहे. तर शेणाचा वापर यामध्ये हे घटक त्वरित सडविण्यसासाठी केला जातो. गोमुत्र आणि निंबोळी पावडरला शेण सडविण्याची प्रक्रीया जलदगतीने करतो.  हे सर्व मिश्रणावर २० दिवस सडवून ठेवण्याची प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर याला गाळून बरणीत भरुन ठेवल्या जाते. या कीटकनाशकाचा वापर केल्यास उत्पन्नात २० टक्के फरक जाणवतो. एका लिटरमध्ये तीन एकर शेतीची फवारणी होते. ज्यासाठी कोणत्याही कंपनीचे स्वस्तात स्वस्त किटकनाशक घेतले तरी १६०० ते २००० रुपये खर्च येतो व शेतीच्या पोतातही फरक पडतो. परंतु गोमुत्र, निंबोळीपावडर व शेणापासून तयार करण्यात येत असलेल्या कीटकनाशकामुळे शेतीच्या पोतही चांगला राहतो व हा प्रयोग शेतकºयांना घरच्या घरी सुध्दा करता येतो. सर्व शेतकºयांनी याचा वापर केल्यास कोणत्याही किटकनाशकाची आवश्यकता पडणार नाही. याबाबत आपण शेतकºयांना प्रशिक्षणही देत असल्याचे  एकाडे यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Pesticides made from gooseberry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.