पीटर मुखर्जीने वरळीतील आलिशान घर विकायला काढलं
By admin | Published: March 12, 2016 05:52 PM2016-03-12T17:52:19+5:302016-03-12T17:52:19+5:30
शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जीने कायदेशीर लढाईसाठी आपलं वरळीतील घर विकायला काढलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. १२ - शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जीने कायदेशीर लढाईसाठी आपलं वरळीतील घर विकायला काढलं आहे. एकेकाळी देश- परदेशात फिरत ऐशो-आरामचं आयुष्य जगणा-या पीटर मुखर्जीवर आता घर विकायची पाळी आली आहे. पीटर मुखर्जीचं वरळीतील मार्लो इमारतीच्या पाचव्या मजल्यावर 3000 स्क्वेअर फुटांचं डुप्लेक्स घर आहे. सध्या या घराची किंमत 15 ते 20 कोटींच्या घरात आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीप्रमाणे पीटर मुखर्जीवर शीना बोराच्या हत्येचा, कट रचल्याचा, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पीटर मुखर्जीने कायदेशीर लढाई लढण्यासाठी सर्वात महागड्या वकिलाची नियुक्ती केली आहे. प्रत्येक सुनावणीला 3 ते 5 लाख रुपये वकिलाला फी द्यावी लागत आहे. आतापर्यंत पीटर मुखर्जीने 1.5 कोटी खर्च केले आहेत.
सोसायटीच्या पदाधिका-यांना हा फ्लॅट विकण्यासाठी काढत असल्याची माहिती देण्यात आली आहे. सोसायटीला हा फ्लॅट विकण्यापासून रोखण्याचा अधिकार असल्याने त्यांना अगोदर माहिती देण्यात आली आहे.