तटकरेंविरोधातील याचिका निकाली
By admin | Published: July 16, 2015 12:24 AM2015-07-16T00:24:23+5:302015-07-16T00:24:23+5:30
माजी मंत्री सुनील तटकरे यांची एसीबी चौकशी करा, अशा मागणीची भाजपा खासदार किरीट सोमय्या यांची जनहित याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली.
मुंबई : माजी मंत्री सुनील तटकरे यांची एसीबी चौकशी करा, अशा मागणीची भाजपा खासदार किरीट सोमय्या यांची जनहित याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली.
न्या. नरेश पाटील व न्या. एस. बी. शुक्रे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. हंगामी अॅड़ जनरल अनिल सिंग व मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी तटकरे यांच्यावरील आरोपांची एसीबी चौकशी करीत असल्याचे खंडपीठाला सांगितले. त्याचवेळी सोमय्या यांच्या वकिलानेही एसीबी चौकशी सुरू असल्याने ही याचिका निकाली काढण्यास काही हरकत नसल्याचे न्यायालयासमोर स्पष्ट केले. तटकरे यांनी स्वत:च्या व कुटुंबीयांच्या नावे ५१ कंपन्या काढून शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या़ याने शासनाचा महसूल बुडाला असून यात मनी लाँड्रिगही झाले आहे़ त्यामुळे याची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी सोमय्या यांनी याचिकेत केली होती. त्याची दखल घेत न्यायालयाने एसीबीला याचा तपास करण्याचे आदेश दिले होते.