संजय दत्तच्या सुटकेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका
By admin | Published: February 24, 2016 05:34 PM2016-02-24T17:34:13+5:302016-02-24T17:34:13+5:30
अभिनेता संजय दत्तच्या सुटकेविरोधात उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे
ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. २४ - अभिनेता संजय दत्तच्या सुटकेविरोधात उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. न्यायालय लोकांच्या हिताचा विचार करत निर्णय देईल असा विश्वास प्रदीप भालेकर यांनी व्यक्त केला आहे.
संजय दत्तची २५ फेब्रुवारीला येरवडा तुरूंगातून सुटका होणार आहे. सकाळी ९ वाजता संजय दत्तची कारगृहातून सुटका होऊ शकते. संजय दत्तची पत्नी मान्यता तसंच नातेवाईक येरवड्यामध्ये हजर असणार आहेत. मुंबईतील बॉम्बस्फोटांदरम्यान बेकायदेशीररित्या शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला ५ वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र या खटल्याचे कामकाज सुरू असताना त्याने १८ महिने तुरूंगात काढल्यामुळे त्याला साडेतीन वर्षांचा कालावधी तुरूंगाता काढावा लागणार होता. अखेर आता २५ फेब्रुवारी रोजी त्याची तुरूंगातून सुटका होणार आहे.