वाइन शॉप मालकांची उच्च न्यायालयात याचिका

By admin | Published: May 31, 2017 04:21 AM2017-05-31T04:21:49+5:302017-05-31T04:21:49+5:30

राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गांलगत ५०० मीटरदरम्यान असलेली परमिट रूम व वाइन शॉप बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने

Petition of Wine Shop owners High Court | वाइन शॉप मालकांची उच्च न्यायालयात याचिका

वाइन शॉप मालकांची उच्च न्यायालयात याचिका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गांलगत ५०० मीटरदरम्यान असलेली परमिट रूम व वाइन शॉप बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर २०१६मध्ये दिला. मात्र राज्य सरकारने या आदेशाचा चुकीचा अर्थ काढत राज्य मार्गावरीलही परमिट रूम आणि वाइन शॉप बंद केल्याने कोल्हापूर, सातारा व सांगली येथील ५०हून अधिक परमिट रूम व वाइन शॉप मालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सरकारने नोटीस रद्द करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. या याचिकांवरील सुनावणी सुटीकालीन न्यायालयापुढे होणार आहे.

Web Title: Petition of Wine Shop owners High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.