राणेंविरोधातील याचिकाकर्ते केतन तिरोडकरांनी मागणी केल्यास त्यांना पोलीस संरक्षण देऊ- दीपक केसरकर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2017 09:53 PM2017-11-02T21:53:43+5:302017-11-02T21:54:08+5:30
याचिकाकर्ते केतन तिरोडकर यांनी मागणी केल्यास त्याना पोलीस संरक्षण दिले जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तीन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौ-यावर असलेल्या मंत्री केसरकर यांनी गुरुवारी रात्री उशिरा सावंतवाडीत पत्रकारांशी संवाद साधला.
सावंतवाडी : स्वच्छ मंत्रिमंडळात कलंकित व्यक्तीला घ्यायचे की नाही ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओळखावे. मात्र मला मिळालेल्या ईश्वरी संकेताप्रमाणे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या विरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयात आठवड्यात तीन वेळा सुनावणी झाली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी एवढे होणे म्हणजे केवढा हा ईश्वरी संकेत आहे, असा खुलासा राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केला. तसेच याचिकाकर्ते केतन तिरोडकर यांनी मागणी केल्यास त्याना पोलीस संरक्षण दिले जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तीन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौ-यावर असलेल्या मंत्री केसरकर यांनी गुरुवारी रात्री उशिरा सावंतवाडीत पत्रकारांशी संवाद साधला.
मंत्री केसरकर म्हणाले, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यांची तीन वेळा सुनावणी झाली आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने भ्रष्ट व्यक्तीची यादी सरकारकडे मागितली आहे. त्यामुळे अशा कलंकित व्यक्तींना मंत्री मंडळात घ्यायचे की नाही ते मुख्यमंत्र्यांनी ठरवावे, असे सांगत मुख्यमंत्र्यांवर वरून दबाव असू शकतो, असा खुलासा त्यामुळे त्यांना हे करावे लागत आहे. अन्यथा लोकनेता असलेल्या एकनाथ खडसे यांच्यावर आरोप झाले तर त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्यात आले आहे. मग राणे यांची चौकशी सुरू झाली तर त्यांनाही घ्यायचे की नाही घ्यायचे ते भाजपाने ठरवावे असे सांगितले. राणेंमुळे शिवसेना कधीही सरकारमधून बाहेर पडणार नसल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले. तसेच जिल्हाप्रमुख व संपर्कप्रमुख यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली. त्यात पुढील दोन वर्षांत निवडणूक असून त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती, असे सांगितले. त्यामुळे सरकारमधून बाहेर पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे जाहीर केले.
माझ्यावर टीका करणा-या सतीश सावंत यांना ईश्वरी संकेताचे महत्त्व काय कळणार, जे लोक पुण्यवान असतात, त्यांनाच ईश्वरी संकेत मिळत असतात. सावंत हे नेहमी या ना त्या कारणाने अडचणीत येतात. त्यामुळे त्यांना माझ्या विरोधात काही तरी बोलावे लागते आणि त्यांना बोलण्याशिवाय पर्यायच नाही अन्यथा त्यांचे नेते विचारतील, अशी टीकाही मंत्री केसरकर यांनी केली.
ईडीच्या चौकशीत एका नेत्याचे काय झाले ते बघा
ईडीच्या चौकशीत राज्यातील एका नेत्याचे काय झाले त्याचा अभ्यास करावा. त्यामुळे मनी लाँड्रिंग हा मोठा गुन्हा आहे. त्यात काही होऊ शकते, सर्वोच्च न्यायालयानेही अशा राजकीय व्यक्तीची यादी मागवली असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.