राज्यात पेट्रोल, डिझेल दोन रुपयांनी महागले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 06:49 AM2020-05-31T06:49:30+5:302020-05-31T06:49:57+5:30
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे राज्य शासनाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई : पेट्रोल आणि डिझेलवर लिटरमागे प्रत्येकी दोन रुपये सेस वाढविण्याण्याचा निर्णय राज्य शासनाने शनिवारी घेतला. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे राज्य शासनाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
"08.12 इतका सेस पेट्रोलवर आतापर्यंत होता तो आता १० रुपये १२ पैसे करण्यात आला आहे. डिझेलवर एक रुपया सेस होता तो आता तीन रुपये करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या दहा महिन्यात राज्य शासनाच्या तिजोरीत ३ हजार कोटी रुपयांची अतिरिक्त भर पडेल, असा अंदाज आहे. गेल्या अर्थसंकल्पात मुद्रांक शुल्क कमी करताना पेट्रोल, डिझेलवरील सेस वाढविण्यात आला होता. त्यानंतरची ही दुसरी वाढ आहे.