पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ
By Admin | Published: May 31, 2016 11:26 PM2016-05-31T23:26:32+5:302016-05-31T23:47:13+5:30
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली असून नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहेत. पेट्रोल प्रतीलिटर २.५८ रूपयाने, तर डिझेल प्रतीलिटर २.२६ रुपयांनी महागणार आहे
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, ३१ : कच्च्या तेलाच्या किती वाढत चालल्याने तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यास सुरुवात केली असून, पेट्रोल प्रती लिटर २.५८ रूपयाने, तर डिझेल प्रतीलिटर २.२६ रुपयांनी महागणार आहे. नवे दर मंगळवारी मध्यरात्रीपासून लागू होणार असल्याचे इंडियन आॅइल कॉर्पोरेशनने सांगितले. महिनाभरात तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात सलग तीन वेळा वाढ केली. महिनाभरात पेट्रोल लीटरमागे ४ रुपये ४७ पैशांनी महागले आहे. डिझेलची महिनाभरात दुसऱ्यांदा वाढ झाली असून, या महिन्यात डिझेल ३ रुपये २५ पैशांनी महाग झाले आहे.