पेट्रोल, डिझेल स्वस्त

By admin | Published: July 12, 2017 04:42 AM2017-07-12T04:42:02+5:302017-07-12T04:42:02+5:30

केंद्र शासनाने पेट्रोल व इंधनावर लावलेला सरचार्ज रद्द करावा, ही राज्य शासनाची मागणी मान्य करून केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने राज्यातील इंधनावरचा सरचार्ज रद्द केला

Petrol, diesel cheap | पेट्रोल, डिझेल स्वस्त

पेट्रोल, डिझेल स्वस्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्र शासनाने पेट्रोल व इंधनावर लावलेला सरचार्ज रद्द करावा, ही राज्य शासनाची मागणी मान्य करून केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने राज्यातील इंधनावरचा सरचार्ज रद्द केला आहे. त्यामुळे राज्यातील पेट्रोल ६७ पैसे ते १ रुपया ७७ पैसे इतके आणि डिझेल १ रुपये २५ पैसे ते १ रुपये ६६ पैसे इतके स्वस्त झाले आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी दिली.
राज्यात वस्तू व सेवा कर रद्द झाल्यामुळे इंधनावर पेट्रोलियम कंपन्यांनी लावलेला स्टेट स्पेसिफिक सरचार्ज रद्द करावा, अशी मागणी ग्राहक संरक्षण मंत्री बापट यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांच्याकडे केली होती. प्रधान यांनी स्टेट स्पेसिफिक सरचार्ज पाच दिवसांत रद्द करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते.
मुंबईत तेल कंपन्यांचे दोन रिफायनरी आहेत. त्यात आयात होणाऱ्या कच्च्या तेलावर मुंबई महापालिका जकात वसूल करत होती, ही रक्कम वार्षिक सुमारे ३००० कोटी होती व त्याच्या वसुलीपोटी महाराष्ट्रात विक्री होणाऱ्या पेट्रोलियम पदार्थांवर तेल कंपन्या राज्य विशेष कर (स्टेट स्पेसिफीक सरचार्ज) लावत होत्या. जीएसटी लागू झाल्यानंतर मुंबईतील कच्च्या तेलावरील जकातही मुंबई महापालिकेने थांबविल्याने हा सरचार्ज रद्द न करता तेल कंपन्या महाराष्ट्रात त्याची वसुली करत असल्याचे निवेदन ‘फामपेडा’ संघटनेचे अध्यक्ष उदय लोध यांनी ग्राहक संरक्षण खात्याकडे ३ जुलैला दिले होते.

Web Title: Petrol, diesel cheap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.