Petrol, Diesel Price Today: कसला दिलासा! राज्य सरकारने व्हॅटमध्ये कपात केली, पण पेट्रोल, डिझेलचे दर बदललेच नाहीत; गौडबंगाल काय?
By हेमंत बावकर | Published: May 23, 2022 08:06 AM2022-05-23T08:06:46+5:302022-05-23T08:12:50+5:30
No Petrol, Diesel Price cut Today: नागरिकांना आज सोमवारी आणखी दिलासा मिळेल असे वाटत होते. परंतू तसे झाले नाही. कालच्याच केंद्र सरकारने कमी केलेल्या दराने आज राज्यात पेट्रोल, डिझेल विक्री करण्यात येत आहे. गौडबंगाल काय?
- हेमंत बावकर
महागाईने सामान्यांची कष्टाची कमाई गिळंकृत करण्यास सुरुवात केल्याने दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने अबकारी करात दुसऱ्यांदा कपात केली. या आधीची कपात दिवाळीच्या पूर्वसंध्येला झाली होती. पुन्हा एप्रिलमध्ये दर वाढले होते. मात्र, इतर राज्यांनी धडाधड कर कमी केले तरी आपल्या राज्य सरकारने आडमुठेपणा दाखवत दर कपात केली नव्हती. अखेर केंद्राच्या दुसऱ्या दरकपातीनंतर राज्य सरकारने किंचित का होईना व्हॅट कमी केला आहे.
यामुळे नागरिकांना आज सोमवारी आणखी दिलासा मिळेल असे वाटत होते. परंतू तसे झाले नाही. कालच्याच केंद्र सरकारने कमी केलेल्या दराने आज राज्यात पेट्रोल, डिझेल विक्री करण्यात येत आहे. म्हणजेच नागरिकांना दिलासा मिळालेला नाही.
राज्यात पेट्रोलवरील कर २ रुपये ८ पैसे, तर डिझेलवरील कर १ रुपया ४४ पैशांनी कमी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर वार्षिक अडीच हजार कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. केरळ, राजस्थान, ओडिशा या राज्यांनीही पेट्रोल - डिझेलवरील वॅटमध्ये कपात केली. मात्र दुसरीकडे भाजपशासित १२ पेक्षा अधिक राज्यांनी करकपात केलेली नाही. कर्नाटक सरकारने करकपातीबाबत विचार करू असे म्हटले आहे. भाजप सत्तेत असलेल्या या राज्यांनी गेल्यावेळी कपात केली होती. यामुळे त्यांनी सध्या इंटरेस्ट दाखविलेला नाही.
महाराष्ट्रात व्हॅटमध्ये कपात झाली तरी....
असे असले तरी महाराष्ट्र सरकारने दबावातून पेट्रोल, डिझेलवरील करात कपात केली आहे. मात्र, आज राज्यातील पेट्रोल पंपांवर दर कमी झालेले नाहीत. काल रविवार असल्याने हे दर कमी न झाल्याची शक्यता आहे. या कर कपातीचा परिणाम उद्यापासून किंवा १ जूनपासून मिळणार आहे. आज कंपन्यांनी हे दर जैसे थेच ठेवले आहेत. यामुळे नागरिकांना आजचा दिवस किंवा पुढचे आठ-नऊ दिवस महाराष्ट्र सरकारने केलेल्या दर कपातीची वाट पहावी लागणार आहे.
काय आहे आजचा दर...
- मुंबईत आज पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल ₹ 97.28 प्रती लीटर आहे.
- पुण्यात आज पेट्रोल 110.95 रुपये आणि डिझेल ₹ 95.44 प्रती लीटर आहे.
- नागपुरात आज पेट्रोल 111.41रुपये आणि डिझेल ₹ 95.92 प्रती लीटर आहे.