६ ऑक्टोबरपूर्वी पेट्रोल, डिझेल LBT मुक्त, उद्याचा नियोजित संप मागे
By admin | Published: September 6, 2015 07:58 PM2015-09-06T19:58:36+5:302015-09-06T19:59:27+5:30
स्थानिक स्वराज संस्था कराविरोधात (एलबीटी) राज्यातील पेट्रोलपंप चालकांचा सोमवारी होणारा संप मागे घेण्यात आला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - स्थानिक स्वराज संस्था कराविरोधात (एलबीटी) राज्यातील पेट्रोलपंप चालकांचा सोमवारी होणारा संप मागे घेण्यात आला आहे. ६ ऑक्टोबरपूर्वी पेट्रोल व डिझेलला एलबीटी मुक्त करण्याचे आश्वासन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्यानंतर पेट्रोलपंप चालकांनी संप मागे घेतला आहे.
पेट्रोल व डिझेलवरील एलबीटी रद्द करावी अशी पेट्रोलपंप चालकांची प्रलंबित मागणी आहे. एलबीटी रद्द केल्यास इंधनाचे दर २ ते ५ टक्क्यांनी कमी होतील असे पेट्रोलपंप चालकांचे म्हणणे आहे. या मागणीसाठी ७ सप्टेंबर रोजी मुंबईवगळता राज्यातील २५ महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोल पंप चालकांनी एक दिवसांच्या संपाची हाक दिली होती. यामुळे सोमवारी वाहनचालकांचे हाल होण्याची दाट शक्यता होती. मात्र रविवारी संध्याकाळी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पेट्रोलपंप चालकांना एलबीटी मुक्तीचे आश्वासन दिल्याने हा संप मागे घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास राज्यातील पेट्रोल व डिझेलच्या दरात २ ते ३ रुपयांची घट होईल अशी शक्यता आहे.