BIG BREAKING: पेट्रोल, डिझेल आता आणखी स्वस्त; केंद्राच्या घोषणेनंतर राज्य सरकारकडूनही VAT मध्ये कपात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 05:59 PM2022-05-22T17:59:36+5:302022-05-22T18:57:09+5:30

केंद्र सरकारने काल पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने आज 22 मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात ( VAT) अनुक्रमे २ रुपये ८ पैसे आणि १ रुपया ४४ पैसे प्रती लिटर कपात केली आहे.

Petrol diesel State government also reduced VAT after the Centre announcement | BIG BREAKING: पेट्रोल, डिझेल आता आणखी स्वस्त; केंद्राच्या घोषणेनंतर राज्य सरकारकडूनही VAT मध्ये कपात

BIG BREAKING: पेट्रोल, डिझेल आता आणखी स्वस्त; केंद्राच्या घोषणेनंतर राज्य सरकारकडूनही VAT मध्ये कपात

googlenewsNext

मुंबई-

केंद्र सरकारने काल पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने आज 22 मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात ( VAT) अनुक्रमे २ रुपये ८ पैसे आणि १ रुपया ४४ पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे २५०० कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे. तर राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.

मूल्यवर्धित कर कमी केल्याने पेट्रोलकरिता ८० कोटी रुपये महिन्याला आणि १२५ कोटी रुपये डिझेलकरिता इतके महसुली उत्पन्न कमी होणार आहे. १६ जून २०२० ते ४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे ७ रुपये ६९ पैसे आणि १५ रुपये १४ पैसे प्रती लिटर कर आकारात होते. मार्च आणि मे २०२० मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे १३आणि १६ रुपये अशी वाढ केली होती.

केंद्रानं दिला मोठा दिलासा
इंधनाच्या भडकलेल्या किमती आणि महागाईमुळे होरपळलेल्या जनतेला केंद्र सरकारने काल मोठा दिलासा दिला. सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे ८ आणि ६ रुपये प्रति लिटर कपात करण्याची घोषणा केली. तसेच उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना घरगुती गॅसवर प्रति सिलिंडर २०० रुपये अनुदान देण्याचेही सरकारने जाहीर केले. याशिवाय किमती कमी करण्यासाठी काही उत्पादनांवरील आयात शुल्कातही कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 

Web Title: Petrol diesel State government also reduced VAT after the Centre announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.