पेट्रोल पंप चालक 16 जून रोजी पुकारणार देशव्यापी संप

By admin | Published: June 11, 2017 12:21 PM2017-06-11T12:21:33+5:302017-06-11T12:21:33+5:30

देशभरातील पेट्रोल पंप चालकांनी बंदची हाक दिली आहे.

The petrol pump driver will call on June 16 | पेट्रोल पंप चालक 16 जून रोजी पुकारणार देशव्यापी संप

पेट्रोल पंप चालक 16 जून रोजी पुकारणार देशव्यापी संप

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - देशभरातील पेट्रोल पंप चालकांनी बंदची हाक दिली आहे. 16 जूनपासून पेट्रोल पंप चालक देशव्यापी संप पुकारणार आहेत. 16 ते 24 जूनदरम्यान देशभरातील सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलची खरेदी-विक्री बंद ठेवण्याचा निर्णय डिलर्स असोसिएशननं जाहीर केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या भावात दररोज चढ-उतार होत असल्यानं दरदिवशी पेट्रोल-डिझेलचे दर बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र या निर्णयाला फेडरेशन ऑफ ऑल इंडिया पेट्रोलियम डिलर्सने विरोध दर्शवला आहे.

तेल कंपन्यांनी देशात 16 जूनपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलण्याचा निर्णय घेतला होता. पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदीच्या व्यवहारात पारदर्शकता यावी आणि पेट्रोल आणि डिझेलच्या चढ-उताराचा ग्राहकांना फटका बसू नये, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे ऑइल कंपन्यांनी सांगितले होते.

त्याच पार्श्वभूमीवर उदयपूर, जमशेदपूर, पुद्दुचेरी, चंदीगढ आणि विशाखापट्टणम या पाच शहरांत 1 मेपासून पेट्रोलियम कंपन्यांनी दर बदलण्याचा प्रयोग सुरू ठेवला आहे.  याला चांगला प्रतिसाद मिळत असल्यानं हा प्रयोग आता संपूर्ण देशात राबविण्याचा विचार सरकार करत आहे. या बंदनंतरही केंद्राने आपला निर्णय मागे घेतला नाही, तर 24 जूननंतरही बेमुदत बंदचा इशारा डिलर्सच्या असोसिएशननं दिला आहे.

16 जूनपासून रोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किमती

तत्पूर्वी भारतातील सर्व तेल कंपन्या 16 जूनपासून देशभरात रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा आढावा घेणार आहेत. म्हणजे संध्याकाळी ज्या किंमतीत पेट्रोल भरलं असेल त्याच किंमतीत तुम्हाला सकाळी पेट्रोल मिळेल याची काही शाश्वती नाही. याचाच अर्थ कधी पेट्रोल स्वस्त असेल तर कधी महाग. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या महत्वांच्या कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलण्याचा निर्णय घेतला आहे.  

Web Title: The petrol pump driver will call on June 16

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.