पेट्रोलपंप घोटाळा; अटकपूर्व जामिनासाठी २४ जण उच्च न्यायालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 02:11 AM2017-11-18T02:11:25+5:302017-11-18T02:11:35+5:30
पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी कल्याण अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळलेल्या आठ जणांसह तब्बल २४ जणांनी जामिनासाठी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
ठाणे : पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी कल्याण अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळलेल्या आठ जणांसह तब्बल २४ जणांनी जामिनासाठी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यामध्ये पेट्रोलपंपमालक-चालक आणि व्यवस्थापकांचा समावेश असल्याचे पोलीस सूत्रांनी शुक्रवारी सांगितले.
पोलिसांनी महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यांत, तर ओडिशा राज्यातील दोन ठिकाणी इंडियन आॅइल ८७ पंप, हिंदुस्तान पेट्रोलियम ६९ पंप, भारत पेट्रोलियम १४, एरसार पेट्रोलियम ८ पंप अशा एकूण १८८ पेट्रोलपंपांवर कारवाई करून आतापर्यंत ३३ जणांना अटक केली आहे. त्यानंतर, पेट्रोलपंपमालकांनी अटक होऊ नये, यासाठी कल्याण अतिरिक्त सत्र न्यायालयात धाव घेत अर्ज सादर केला होता. त्यानंतर, ३ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने अटकपूर्व जामीन आणि जामीन मिळावा, यासाठी अर्ज करणाºया ४६ जणांचा एकाच वेळी अर्ज फेटाळला. १६ जणांच्या अर्जावर २९ नोव्हेंबर, तर ८ जणांच्या अर्जावर ६ डिसेंबर रोजी उच्च न्यायालयात निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.