पुण्यातही पेट्रोल पंप घोटाळा, इंडियन ऑईल पेट्रोल पंप केलं सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 05:31 PM2017-07-22T17:31:57+5:302017-07-22T17:31:57+5:30

ठाणे पाठोपाठ पुण्यातही पेट्रोलच्या मापात पाप असल्याचे आढळून आले. पुण्यातील पेट्रोल पंपांवरही मापामध्ये छेडछाड केली जात असल्याचे उघड झाले आहे.

Petrol pump scam in Pune, Indian Oil Petrol Pump Banana Seal | पुण्यातही पेट्रोल पंप घोटाळा, इंडियन ऑईल पेट्रोल पंप केलं सील

पुण्यातही पेट्रोल पंप घोटाळा, इंडियन ऑईल पेट्रोल पंप केलं सील

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 22 -  ठाणे पाठोपाठ पुण्यातही पेट्रोलच्या मापात पाप असल्याचे आढळून आले. पुण्यातील पेट्रोल पंपांवरही मापामध्ये छेडछाड केली जात असल्याचे उघड झाले आहे. ठाण्यामध्ये करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान अटकेतील आरोपींच्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे. 
 
यानंतर ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं पुणे-अहमदनगर राज्य महामार्गावरील चंदन नगर भागातील इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर कारवाई करत पंप सील केला आहे. पुण्यातील ही पहिलीच कारवाई आहे. मात्र पुण्यातील आणखी पेट्रोल पंपांबाबतही आपणाकडे माहिती असून तेथेही कारवाई होऊ शकते, असे  पोलीस अधिकारी कल्याणराव करपे यांनी सांगितले आहे. 
 
दरम्यान, 12 जुलै रोजी ठाणे शहरात इलेक्ट्रॉनिक चीपद्वारे पेट्रोलच्या मापात पाप करणारा सूत्रधार प्रशांत नूलकर याला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. ठाणे क्राईम ब्रांचनं ही कारवाई केली. कर्नाटकमधील हुबळीमधून प्रशांत नूलकरला ताब्यात घेतले.  
इंधन भरण्याच्या यंत्रामध्ये छेडछाड करुन घोटाळा केल्याचे प्रकरण समोर आले होते.

आणखी बातम्या वाचा
(पेट्रोल पंप: आतापर्यंत १७ जिल्हयांमध्ये ११८ ठिकाणी छापे)
(पेट्रोल पंपावरील कारवाईचा सिलसिला सुरूच, चौघांना अटक)
(पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची कामगार आयुक्त, ‘पीएफ’ कार्यालयाकडे तक्रार)
पेट्रोल वेन्डिंग मशिनमध्ये झालेल्या छेडछाडीमुळे ग्राहकाला 4 ते 5 टक्के पेट्रोल कमी मिळायचे. म्हणजेच एका लिटरमागे जवळपास 20 मिलीलिटर इंधनाचा घोटाळा होत होता.  एवढ्या मोठ्या ग्राहकांची फसवणूक सुरू आहे.
 
चिपद्वारे होत असलेली पेट्रोलचोरी पकडण्यासाठी ठाणे क्राईम ब्रांचकडून राज्यभरात धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. मागील एक महिन्यात ठाण्यातील 98 पेट्रोलपंप सील करण्यात आली आहेत. ठाणे क्राईम ब्रांचने मे महिन्यात प्रशांत नूलकरचा साथीदार विवेक शेट्येला अटक केली होती. त्यानेच या चिप देशभरातील पेट्रोल पंपावर पुरवल्या आहेत. प्रशांत नूलकर आणि विवेक शेट्ये यांच्यासह ठाणे पोलिसांनी यापूर्वी सहा जणांना अटक केली आहे.   
 

Web Title: Petrol pump scam in Pune, Indian Oil Petrol Pump Banana Seal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.