पेट्रोल घोटाळा - सर्वाधिक छापे ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 04:01 AM2017-07-27T04:01:50+5:302017-07-27T04:01:54+5:30
कमी पेट्रोल देऊन ग्राहकांची फसवणूक करणाºया राज्यभरातील पेट्रोलपंपांविरुद्ध ठाणे पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईस एक महिना पूर्ण झाला. यात एकूण १४१ पंपांवर छापे टाकून ८२ घोटाळेबाज पंपांना पोलिसांनी सील ठोकले.
ठाणे : कमी पेट्रोल देऊन ग्राहकांची फसवणूक करणाºया राज्यभरातील पेट्रोलपंपांविरुद्ध ठाणे पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईस एक महिना पूर्ण झाला. यात एकूण १४१ पंपांवर छापे टाकून ८२ घोटाळेबाज पंपांना पोलिसांनी सील ठोकले. सर्वाधिक ३७ छापे ठाणे जिल्ह्यात टाकण्यात आले. आतापर्यंत २३ आरोपींना अटक करण्यात आली.
पेट्रोलपंपांवरील डिस्पेन्सिंग युनिटमध्ये इलेक्ट्रॉनिक चिप लावून हेराफेरी करणाºया पंपांविरुद्ध ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने १६ जूनपासून कारवाई सुरुकेली. आतापर्यंतच्या छाप्यांपैकी ५८ टक्के पेट्रोलपंपांवर हेराफेरी आढळली. यावेळी वापरलेले २६२ पल्सरकार्ड, २० सेन्सरकार्ड, १११ कंट्रोलकार्ड आणि १०० की-पॅड हस्तगत केले. आतापर्यंत इंडियन आॅइलच्या ७२ पंपांवर छापे टाकून ४६ पंपांना सील ठोकले. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या ५१ पैकी २७ पंपांवर हेराफेरी आढळली, तर भारत पेट्रोलियमच्या १२ पैकी ४ तर एस्सारच्या ६ पैकी ५ पंपांवर घोळ आढळला. आणखी काहींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पेट्रोलपंप घोटाळ्यामध्ये आतापर्यंत २३ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळाली आहे. त्याआधारे छाप्यांची कारवाई सुरूच राहणार असून आणखी काही आरोपींनाही लवकरच अटक केली जाईल.
- अभिषेक त्रिमुखे,
पोलीस उपायुक्त
गुन्हे अन्वेषण शाखा, ठाणे.
एकूण छापे
जिल्हा पंप
ठाणे ३७
पुणे २२
नाशिक १५
रायगड ११
सातारा ६
मुंबई ५
औरंगाबाद ६
रत्नागिरी २
नागपूर ५
धुळे ३
अमरावती १
यवतमाळ २
चंद्रपूर २
जळगाव २
कोल्हापूर ८
सांगली ७
पालघर ६
अहमदनगर १
एकूण
सील पंप ८२