पेट्रोल घोटाळा : नागपुरात रिमोट कंट्रोलने हेराफेरी,आतापर्यंत ९० पेट्रोल पंप सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 05:05 AM2017-08-01T05:05:05+5:302017-08-01T05:05:08+5:30
पेट्रोलपंपांवरील डिस्पेन्सिंग युनिटमध्ये हेराफेरी करण्यासाठी रिमोट कंट्रोलचा वापर केल्याचे नागपुरातील कारवाईदरम्यान प्रथमच उघडकीस आल्याची माहिती ठाणे पोलिसांनी सोमवारी दिली.
ठाणे :पेट्रोलपंपांवरील डिस्पेन्सिंग युनिटमध्ये हेराफेरी करण्यासाठी रिमोट कंट्रोलचा वापर केल्याचे नागपुरातील कारवाईदरम्यान प्रथमच उघडकीस आल्याची माहिती ठाणे पोलिसांनी सोमवारी दिली.
दीड महिन्यापासून ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने सुरू केलेल्या धडक कारवाईमध्ये आतापर्यंत १६१ पेट्रोलपंपांवर छापे टाकण्यात आले. नागपुरातील कळमेश्वर रोडवरील दहेगाव येथील श्रीराम नारायणदास सर्व्हो पेट्रोलपंपावर पोलिसांनी छापा टाकला असता येथे रिमोट कंट्रोलचा वापर सुरू असल्याचे आढळले. या पंपांवरील डिस्पेन्सिंग युनिटमध्ये पल्सरकार्डला वायर्सच्या साहाय्याने अतिरिक्त चिप आणि त्यावर अँटेना लावून रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने हेराफेरी केली जात होती.
ग्राहकांना प्रत्येकी ५ लीटरमागे २०० मिलिलीटर पेट्रोल कमी दिले जात होते. या पंपांवरील १३ पैकी १० नोझल्समधून फसवणूक केली जात होती.