औरंगाबादेतील पंपावरही पेट्रोल चोरी

By Admin | Published: June 23, 2017 07:23 PM2017-06-23T19:23:47+5:302017-06-23T19:23:47+5:30

शहरातील जुन्या पेट्रोलपंपापैकी एक असलेल्या अदालत रोडवरील चुन्नीलाल आसाराम पेट्रोलपंपावर मापात पाप होत असल्याचा धक्कादायक प्रकार

Petrol theft on Aurangabad pumps | औरंगाबादेतील पंपावरही पेट्रोल चोरी

औरंगाबादेतील पंपावरही पेट्रोल चोरी

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 23 - शहरातील जुन्या पेट्रोलपंपापैकी एक असलेल्या अदालत रोडवरील चुन्नीलाल आसाराम पेट्रोलपंपावर मापात पाप होत असल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे गुन्हेशाखा, शहर गुन्हेशाखा आणि वजन मापे विभागाच्या अधिकाºयांनी केलेल्या संयुक्त तपासणीत आढळून आले. या पंपावर पाच लिटरमागे ५५ मिली ते ७५ मिलि लिटर पेट्रोल कमी मिळत असल्याचे समोर आले. या पंपावरील महत्वाची उपकरणे पोलिसांनी जप्त केली आहे. 
 
ठाणे आणि उत्तरप्रदेशातील काही पेट्रोलपंपाच्या मशीनमध्ये इलेक्ट्रॉर्निक्स चीप बसवून ग्राहकांना कमी पेट्रोल दिल्या जात असल्याचे उघडकीस आले होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर शहर गुन्हेशाखेच्या पोलिसांनी १८ जून रोजी रविवारी शहरातील चार पेट्रोलपंपाची तपासणी केली होती. मात्र या तपासणीत एकाही पेट्रोलपंपावर पेट्रोल चोरी आढळली नव्हती. मात्र शहरातील काही पेट्रोलपंपावर पेट्रोल चोरी होत असल्याची पक्की माहिती सूत्राकडून पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना मिळाली होती. पंपचालकांची पेट्रोल चोरी तपासण्याचे तंत्रशुद्ध ज्ञान आवश्यक असते. ही बाब लक्षात घेऊन पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी ठाणे शहर गुन्हेशाखेच्या पोलिसांनाच औरंगाबादेत बोलावून कारवाई करण्याची सूचना केली. यानंतर गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास  घोडके , पोलीस उपनिरीक्षक अविनाश महाजन, पोलीस उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अंकुश भोसले, सुरेश यादव, प्रशांत भुरके, संतोष सुर्वे यांचे पथक  बुधवारी रात्री शहरात दाखल झाले.  
 
वजन मापे निरीक्षक, इंडियन आॅईल कॉर्पोरेशनचे अधिकारी आणि शहर गुन्हेशाखेच्या एका पथकाला सोबत घेऊन गुरूवारी दुपारी ठाणे पोलिसांनी अदालत रोडवरील चुन्नीलाल आसाराम पेट्रोलपंपावर धाड मारली. या धाडीत तेथील पेट्रोल आणि डिझेल वितरण करणाºया यंत्रांची तपासणी करण्यात आली. यावेळी वजन मापे विभागाने आणलल्या पाच लिटरच्या मापात पेट्रोल घेण्यात आले असता पंपावरील आकडीनुसार मापात पाच लिटर पेट्रोल टाकल्याचे दिसत होते. प्रत्यक्षात मात्र हे माप रिकामे होते. यानंतर वजन मापे अधिका-यांनी पंचासमक्ष त्या रिकाम्या मापात आणखी पेट्रोल टाकले.वरुन टाकलेल्या पेट्रोल हे काही यंत्रावर ५५ मिली, ६० मिलि आणि ७५ मिली लिटर एवढे होते. यावरुन या पंपावर प्रती पाच लिटरमागे ग्राहकांना ५५ मिलि ते ७५ मिलि लिटर कमी पेट्रोल दिले जात होते.
 

Web Title: Petrol theft on Aurangabad pumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.