पीएफ खातेधारकांनो इकडे लक्ष द्या...! ३१ डिसेंबरपूर्वी केवायसी जमा करा....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 12:34 PM2018-12-26T12:34:02+5:302018-12-26T12:34:05+5:30

कर्मचारी भविष्य निधी संगठन कार्यालयात एक केंद्र सुरू करण्यात आले आहे.

PF account holders pay attention ...! Submit KYC before 31st December .... | पीएफ खातेधारकांनो इकडे लक्ष द्या...! ३१ डिसेंबरपूर्वी केवायसी जमा करा....

पीएफ खातेधारकांनो इकडे लक्ष द्या...! ३१ डिसेंबरपूर्वी केवायसी जमा करा....

Next

औरंगाबाद : विविध ‘ऑनलाईन’ सुविधा मिळविण्यासाठी आधार आणि पॅनकार्ड, तसेच बँक खात्याचे विवरण, हे ‘केवायसी’ दस्तावेज युनिफाईड पोर्टलशी जोडण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०१८ आहे. या निर्धारित मुदतीत केवायसी न केल्यास अनेक सुविधांचा लाभ घेता येणार नाही. 


ऑनलाईन दाव्याचे निराकरण, सदस्य ई-पासबुक डाऊनलोड करणे, युएएन कार्ड, पोर्टिबिलिटी, मासिक सदस्य अंशदान सूचना, एसएमएसद्वारे आॅनलाईन दाव्याचे हस्तांतरण आदी सुविधांचा लाभ घेता येणार नाही. 


यासंदर्भात कर्मचारी भविष्य निधी संगठन कार्यालयात एक केंद्र सुरू करण्यात आले आहे, असे औरंगाबाद विभागाचे भविष्य निर्वाह निधी आयुक्त एम. एच. वारसी यांनी कळविले आहे.

Web Title: PF account holders pay attention ...! Submit KYC before 31st December ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.