फडणवीसजी ‘फिटलं’ म्हणा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 02:07 AM2017-07-30T02:07:21+5:302017-07-30T02:07:25+5:30

राज्य सरकार दात कोरून कर्जमाफी देत आहे. ही दिशाभूल आहे. तत्त्वत:, अंशत: हे शब्द वापरण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी कर्ज ‘फिटलं’ हा शब्द शेतक-यांना

phadanavaisajai-phaitalan-mahanaa | फडणवीसजी ‘फिटलं’ म्हणा!

फडणवीसजी ‘फिटलं’ म्हणा!

Next

अहमदनगर : राज्य सरकार दात कोरून कर्जमाफी देत आहे. ही दिशाभूल आहे. तत्त्वत:, अंशत: हे शब्द वापरण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी कर्ज ‘फिटलं’ हा शब्द शेतकºयांना द्यावा, अशा शब्दांत राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरसकट कर्जमाफीची मागणी सरकारकडे केली.
उत्तर प्रदेशात कर्जमाफी चालते मग, मोदींना महाराष्टÑात याचा बोजा का वाटतो? असा सवालही त्यांनी भेंडा (ता. नेवासा) येथे संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सर्वपक्षीय सत्कार समारंभात केला.
पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री सर्वश्री बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे, जयंत पाटील, बबनराव पाचपुते तसेच यशवंतराव गडाख आदी उपस्थित होते.
भाषणात पवारांनी क्रांतिसिंह नाना पाटलांची आठवण सांगितली. बीडमधून नाना पाटील हे लोकसभेवर विजयी झाले होते. मला निवडून दिल्यास तुमचं ‘फिटलं’ म्हणून समजा, असे आश्वासन त्यांनी शेतकºयांना गावोगावी दिले होते. त्या एका शब्दावर ते विजयी झाले. फडणविसांनीही सगळ्या शेतकºयांचे सरसकट कर्ज माफ करावे. तेव्हाच कर्ज ‘फिटलं’ असे म्हणता येईल, असे ते म्हणाले.
कालच केंद्र सरकारने उद्योजकांचे ८२ हजार कोटींचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. त्याची चर्चा नाही. शेतकºयांच्या कर्जमाफीची मात्र लगेच चर्चा होते. शेतमालाला भाव दिल्यास शेतकरी कर्जमाफी मागणार नाही.
मात्र, सरकार दोन्ही गोष्टी करत नसल्याने ही परिस्थिती उद्भवली. नाशिकचे अतिरिक्त पाणी गोदावरी खोºयात वळविता येईल. पण त्याबाबत केंद्र पातळीवर निर्णय होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

मी करंगळीचे माप शोधतोय
नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशला कर्जमाफीचे आश्वासन दिले व प्रत्यक्षात दिलीही. महाराष्टÑाची कर्जमाफी मात्र त्यांना ओझे वाटते. पंतप्रधानांचे धोरण हे राज्यानुसार कसे बदलते? हा प्रश्न आपणाला पडतो. हेच मोदी ‘पवारांची करंगळी पकडून आपण राजकारण करतो,’ असे सांगतात. त्यांच्या या म्हणण्यामुळे मी सध्या दररोज माझ्या करंगळीचे माप घेतोय, असा मिश्किल टोला पवार यांनी लगावला.

आपण पवारांसोबत - राधाकृष्ण विखे
आपल्याबाबत सर्व राज्यात उत्सुकता आहे. मात्र, काही होणार नाही, काळजी करू नका, असे राधाकृष्ण विखे भाषणात म्हणाले. माझ्याबाबत तुम्हाला कोणी काहीही सांगेल. पण आम्ही तुमच्यासोबत आहोत, असेही ते पवारांना उद्देशून म्हणाले.

Web Title: phadanavaisajai-phaitalan-mahanaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.