पीएच.डी. नियमावलीत बदल
By admin | Published: January 15, 2017 01:27 AM2017-01-15T01:27:23+5:302017-01-15T01:27:23+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने पीएच.डी.च्या नियमावलीत बदल केले आहेत. त्यामुळे पीएच. डी. प्रवेश पात्रतेबरोबच, प्रवेशपूर्व परीक्षा, प्रबंध सादर
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने पीएच.डी.च्या नियमावलीत बदल केले आहेत. त्यामुळे पीएच. डी. प्रवेश पात्रतेबरोबच, प्रवेशपूर्व परीक्षा, प्रबंध सादर करण्याच्या कालमर्यादेत आणि लेखन पद्धती बदलणार आहे. महिला व अपंग संशोधकांना प्रबंध सादर करण्यासाठी विशेष मुदतवाढही देण्यात आली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आदेशानुसार हे बदल करण्यात आले असून, यासंदर्भातील नियमावली विद्यापीठाच्या संस्केतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. नियमबदलामुळे मार्गदर्शकांकडील विद्यार्थी संख्या कमी झाली आहे. परिणामी विद्यार्थ्यांना नव्या मार्गदर्शकांचा शोध घ्यावा लागत आहे. त्यातच विद्यापीठाने पीएच.डी.ट्रॅकिंग सिस्टीम सुरू केल्यामुळे प्रत्येक संशोधक विद्यार्थ्याची माहिती आॅनलाईन उपलब्ध होणे शक्य झाले आहे.
पीएच.डी.प्रवेशासाठी आॅनलाईन पद्धतीने प्रवेश दिले जाणार असून यापुढील काळात २०० गुणांऐवजी केवळ १०० गुणांची परीक्षा घेतली जाईल. विभागातर्फे किंवा संशोधन केंद्राकडून घेतली जाणारी १०० गुणांची लेखी परीक्षा रद्द केली आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारा तीन महिन्यांचा कालावधी वाचणार आहे. विद्यापीठाच्या आॅनलाईन परीक्षेत ५० टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी पीएच. डी. प्रवेशास पात्र असतील.
तसेच पीएच. डी. प्रवेशाच्या पात्रतेसाठी पूर्वी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी ५० टक्के गुणांची मर्यादा होती. आता गुणांची मर्यादा ५५ टक्के केली आहे. मात्र, मागासवर्गीय व अपंग विद्यार्थ्यांसाठी पाच टक्के सवलत दिली आहे. नेट,सेट,जेआरएफ,गेट अशा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तसेच विद्यापीठातून एम.फील. पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांला आॅनलाईन परीक्षेतून सूट दिली जाणार आहे. (प्रतिनिधी)
- विद्यार्थ्यांना कमीत कमी दिड वर्षात एम.फिल. करता येत होते. आता ही मर्यादा एक वर्ष करण्यात आली आहे. तसेच पीएच.डी.ची मर्यादा दोन वर्षाएवजी ती वर्षे झाली आहे. तर विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सहा वर्षे पीच.डी.आणि एम. फिल.पदवी दोन वर्षात पूर्ण करता येईल. परंतु, विद्यार्थ्यांना पीएच. डी.साठी दोन वर्षांची मुदतवाढ दिली जाऊ शकते. महिलांना नियोजित कालावधीपेक्षा १८० दिवस अधिक आणि अपंग विद्यार्थ्यांना १० वर्षांपर्यंत पीएच.डी.पूर्ण करता येईल.