वैतरणा नदीवर मिळवली पीएचडी
By admin | Published: January 20, 2017 03:37 AM2017-01-20T03:37:32+5:302017-01-20T03:37:32+5:30
शिल्पा लक्ष्मण पाटील, यांना वैतरणानदीवरील संशोधन प्रबंधास मुंबई विद्यापीठाने पी.एच.डी डॉक्टरेट प्रदान केली आहे.
राहुल वाडेकर,
विक्रमगड- वाडा तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील शिल्पा लक्ष्मण पाटील, यांना वैतरणानदीवरील संशोधन प्रबंधास मुंबई विद्यापीठाने पी.एच.डी डॉक्टरेट प्रदान केली आहे. डॉ.रघुनंदन आठल्ये, बी.एन. बांदोडकर महाविद्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली वैतरणानदीवरील घोडमाळ गावानजीक महापूरी ते पाचू बेटापर्यतच्या परिसरीचे संशोधनाचे गेली सात वर्ष (२ वर्षे सॅम्पल्स कलेक्शन, ५ वर्षे संशोधन) काम सातत्याने केले आहे.
डॉ. शिल्पा पाटील यानी ) इ.२ू.( ेङ्मङ्म’ङ्मॅ८) बी.एन. बांदोडकर महाविद्यालय ठाणे २००१ मध्ये विषेश नैपुन्याने उतीर्ण. झुनझुनवाला महाविद्यालय मुंबई येथून २००३ मध्ये ट.२ू. ( ेङ्मङ्म’ङ्मॅ८) विषेश नैपुण्य मिळवून प्रथम क्र मांकाने उतीर्ण केले.
वैतरणानदीवरील पाण्याच्या प्रवाहात मौलीक, नैसर्गिक घटक, जैविक संपन्नता सध्या ऱ्हास पावत आहे. जिलेटीनयुक्त डायनामाइटने मासेमारी, किटकनाशकांचा वापर नदीतील कोळंबी पकडण्यासाठी केल्याने जीवसंपत्ती नष्ट होत आहे. नैसर्गिक साधन सामुग्रीने संपन्न असलेल्या या परिसराला धोका उत्पन्न होवू शकतो? असा इशारा त्यांनी आपल्या प्रबंधा द्वारे दिला आहे. संशोधन मार्गदर्शन डॉ.रघुनंदन आठल्ये, आईवडिलांच्या व पती किशोर भोंदे यांच्या सहकार्याने व प्रेरणेने साध्य झाल्याचे शिल्पा यांनी सांगितले.
वैतरणेवरील जगातील पहिलेच संशोधन
या सर्व सूक्ष्म घटनांचा अभ्यास डॉ.शिल्पाने अथक परिश्रम करून केला आहे. वैतरणानदीचा जैविक संशोधनाचा हा जागतिक स्तरावरील पहिलाच शोध निबंध सादर झाला आहे.
समाजाचे व या प्राचिन संपत्तीचे व अवशेषांचे संवर्धन व्हावे हाच मुख्य हेतू आहे. पर्यायाने शेतकऱ्याचे व शेतीव्यवसायाच्या हिताचे हे संशोधन कार्य आहे. यातून परिसरातील सबंध शेतकऱ्याचे नैसिर्गक संपन्नतेमुळे हित होईल. असे मत डॉ. शिल्पा पाटील यांनी यावळी व्यक्त केले आहे .