शेकाप, डाव्या पक्षांसह रिपब्लिकनची महाआघाडी
By admin | Published: September 14, 2014 01:40 AM2014-09-14T01:40:29+5:302014-09-14T01:40:29+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीत शेकाप, डावे पक्ष आणि अन्य संघटनांना घेऊन महाआघाडी करणार असून, 288 जागा लढवणार असल्याचे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी शनिवारी सांगितले.
Next
पुणो : आगामी विधानसभा निवडणुकीत शेकाप, डावे पक्ष आणि अन्य संघटनांना घेऊन महाआघाडी करणार असून, 288 जागा लढवणार असल्याचे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी शनिवारी सांगितले. रिपब्लिकन सेनेने 5क् जागा लढवण्याचे निश्चित केले असून, पुण्यात सात जागांवर उमेदवार रिंगणात उतरविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केल़े
आंबेडकर म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील जनतेला जातियवादी आणि भ्रष्टाचारी सरकार नको आहे, त्यामुळे आम्ही त्यांना हा तिसरा पर्याय देत आहोत. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस निर्माण झालेली मोदी लाट संपली आहे. मोदींनी देशातील जनतेला भाववाढ कमी करण्याचे आश्वासन दिले होते, ते हवेत विरले आहे. सत्तेत असणारे मोदी सरकार काँग्रेसची जुनीच धोरणो राबवत आहे.’’
महाआघाडी करत असताना सर्व जातीधर्माच्या लोकांबरोबर काम करण्याचे निश्चित केले आहे. ओवेसी यांच्या पक्षाला आघाडीत सामील करणार का, या प्रश्नावर ते म्हणाले, या संदर्भात विचार सुरू आहे. कोणत्याही पक्षाबरोबर होणा:या राजकीय युती तात्पुरत्या असतात़ प्रत्येक पक्ष आपल्या विचारसरणीनुसारच काम करत असतो, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)