छायाचित्रकाराच्या आत्महत्येने कोल्हापुरात तणाव

By admin | Published: November 1, 2015 01:49 AM2015-11-01T01:49:03+5:302015-11-01T01:49:03+5:30

खरी कॉर्नर येथील छायाचित्रकार आनंदराव दत्तात्रय चौगले (६५) यांनी शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. भाजपाचे नेते व नगरसेवक आर. डी. पाटील यांच्या धमक्यांमुळे

Photographer's suicide strains in Kolhapur | छायाचित्रकाराच्या आत्महत्येने कोल्हापुरात तणाव

छायाचित्रकाराच्या आत्महत्येने कोल्हापुरात तणाव

Next

कोल्हापूर : खरी कॉर्नर येथील छायाचित्रकार आनंदराव दत्तात्रय चौगले (६५) यांनी शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. भाजपाचे नेते व नगरसेवक आर. डी. पाटील यांच्या धमक्यांमुळे आपण आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी त्यांनी ठेवली होती. महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत या आत्महत्येस राजकीय वळण लागल्याने दिवसभर शहरात तणाव होता.
गेल्या ४० वर्षांपासून फोटोग्राफी व्यवसायात असलेल्या आनंदराव चौगले यांचा खरी कॉर्नर येथे ‘आनंद फोटो स्टुडिओ’ आहे. नेहमीप्रमाणे ते शनिवारी सकाळी सहा वाजता फिरायला बाहेर पडले. त्यांचे धाकटे भाऊ दिनकर हे सकाळी साडेआठच्या सुमारास स्टुडिओ उघडण्यासाठी आले. यावेळी दुकानाचे शटर अर्धवट उघडले होते.
त्यामुळे त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिले असता, आनंदराव यांनी सीलिंंग फॅनच्या हुकाला दोरीने गळफास घेतल्याचे दिसले. पोलिसांनी पाहणी केली असता, टेबलावर चिठ्ठी सापडली, ती त्यांनी जप्त केली. (प्रतिनिधी)

छायाचित्रकार आनंदराव चौगले यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमधील हस्ताक्षर त्यांचेच आहे का, हे तपासण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी यापूर्वी लिहून ठेवलेल्या त्यांच्या काही नोंदवह्या पोलिसांना द्याव्यात, असे पत्र पाठविले आहे. त्यांच्या नोंदवहीतील व चिठ्ठीमधील हस्ताक्षरामध्ये साम्य आढळून आल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल.
- डॉ. मनोजकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक कोल्हापूर

त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. आम्ही कोणाविरोधात अद्याप तक्रार दिलेली नाही, परंतु चिठ्ठीतील मजकुरावरून पोलीस योग्य तो न्याय आम्हाला देतील.
- दिनकर चौगले,
मृत आनंदराव यांचे भाऊ

‘आमदारावर गुन्हा दाखल करा’
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या दारात ठिय्या आंदोलन करीत, नगरसेवक पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते व आमदार हसन मुश्रीफ यांनीही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

Web Title: Photographer's suicide strains in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.