शस्त्रबंदीच्या काळात भाजप पदाधिकाऱ्याचे तलवारीसह फोटोसेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 12:33 PM2019-06-01T12:33:46+5:302019-06-01T12:53:01+5:30
भाजपचा तालुका उपाध्यक्ष बोडखे याने हातात तलवार घेऊन उभा असलेले फोटो सोशल मीडियावर टाकल्यानंतर ही अजून कोणतेही कारवाई करण्यात आलेली नाही.
औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्ता मिळताच भाजपमधील कार्यकर्ते आणि नेत्यांच्या डोक्यात सत्तेची हवा शिरली असल्याचे दिसत आहे. औरंगाबादच्या पैठणमधील भाजप तालुका उपाध्यक्षांंच्या वाढदिवसाला चक्क तलवारीने केक कापण्यात आला आहे. वाढदिवसाला हातात तलवार घेऊन उभा असतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. विशेष म्हणजे जिल्हात शस्त्रबंदी कायदा लागू आहे .
सैराट चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हापासून तरुणाईमध्ये वाढदिवसाला तलवारीने केक कापण्याचा वेगळीच क्रेझ निर्माण झाली. ही क्रेज राजकीय कार्यकर्त्यांमध्ये मोठ्याप्रमाणात पहायला मिळत आहे. पैठण येथील भाजपच्या विद्यार्थी मोर्चाच्या तालुका उपाध्यक्ष करण बोडखे यांनी आपल्या वाढदिवसाला तलवारीने केक कापल्याचे समोर आले आहेत. विशेष म्हणजे, हातात तलवार घेऊन फोटोसेशन करण्यात आल्याचे फोटो बोडखे यांनी आपल्या फेसबुकवरून व्हायरल केली आहेत. यावेळी भाजपचे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दत्ता गोर्डे हे पण त्याठिकाणी उपस्थित होते.
प्रदेश उपाध्यक्ष यांच्या समोर भाजपचा तालुका उपाध्यक्ष जिल्हात शस्त्रबंदी लागू असताना सुद्धा खुलेआम तलवार हातात घेऊन फोटोसेशन करत असताना या फोटोतून स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे सत्तेत असलेल्या भाजपचे पदाधिकारीच कायदा हातात घेत असेल तर 'देशाला अच्छे दिन' येतील असं वाटत नाही.
भाजपचा तालुका उपाध्यक्ष बोडखे याने हातात तलवार घेऊन उभा असलेले फोटो सोशल मीडियावर टाकल्यानंतर, अजून ही कोणतेही कारवाई करण्यात आलेली नाही. त्याबरोबर स्वताला पारदर्शक म्हणणाऱ्या भाजपकडून या पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल.