पिकनिक पॉईंट : हाजरा फॉल (गोंदिया)

By Admin | Published: July 1, 2016 01:08 PM2016-07-01T13:08:50+5:302016-07-01T15:04:08+5:30

महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यात असणारे हाजरा फॉल हे स्थळ दोन्ही राज्यातील पावसाळी पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे

Picnic Point: Hazra Fall (Gondiya) | पिकनिक पॉईंट : हाजरा फॉल (गोंदिया)

पिकनिक पॉईंट : हाजरा फॉल (गोंदिया)

googlenewsNext

 - मनोज ताजने

महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यात असणारे हाजरा फॉल हे स्थळ दोन्ही राज्यातील पावसाळी पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. हे स्थळ मुंबई-कोलकाता या मुख्य रेल्वेमार्गावरील दरेकसा या छोट्या रेल्वे स्टेशनपासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर जंगलाने वेढलेले आहे. उंच पहाडावरून कोसळणारे पाणी आणि तिथे गेल्या दोन वर्षांपासून सुरू करण्यात आलेले विविध साहसी खेळ हे सर्वांसाठी आकर्षण आहे. जुलै ते डिसेंबर महिन्यापर्यंत या धबधब्यातून पाणी वाहत असते. इंग्रज अधिकारी हाजरा यांनी या धबधब्याचा शोध लावून त्याला विकसित केले, म्हणून त्याला हाजरा फॉल असे नाव पडले.

जायचं कसं?-
जवळचे विमानतळ - नागपूर- १८० किलोमीटर
- बिरसी (गोंदिया)- ६० किलोमीटर
जवळचे रेल्वे स्थानक - दरेकसा (फक्त पॅसेंजर गाड्यांचा स्टॉप) - १.५ किलोमीटर
- सालेकसा (काही एक्सप्रेस व सर्व पॅसेंजर गाड्यांचा स्टॉप) - १० किलोमीटर
- गोंदिया (सर्व एक्स्प्रेस गाड्यांचा स्टॉप) - ५२ किलोमीटर
रस्ता मार्ग- नागपूरवरून १९० किलोमीटर (स्पेशल गाडीने येणे सोईस्कर).
- गोंदियावरून ५५ किलोमीटर (एसटी बस उपलब्ध)
(दरेकसा गाडीने पावणे दोन तासात पोहोचता येते. बस हाजराफॉल गेटजवळ थांबते)



बरोबर काय न्यावे आणि काय नेऊ नये-
- सोबत खाण्यापिण्याचे पदार्थ न्यावेत.

- ध्वनीवर्धक यंत्र किंवा मादक पदार्थ घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे.

राहण्याची सोय आहे का? की एका दिवसाची पिकनिक करावी-
- पिकनिक एका दिवसाची करणे सोयीचे आहे. कारण तिथे मुक्कामाची सोय नाही. सालेकसा या तालुका मुख्यालयी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात बुकींग करून राहता येते. सालेकसा येथे भोजनालयाची व्यवस्था आहे. किंवा जिल्हा मुख्यालय असलेल्या गोंदिया येथे मुक्कामासाठी सर्व प्रकारची सोय आहे.

पॉइंटचे ऐतिहासिक  महत्व. -
- १५० वर्षापूर्वी मुंबई-हावडा (कोलकाता) रेल्वेमार्ग दरेकसा नजिक मोठ्या पर्वतरांगेत रेल्वेसाठी बोगदा तयार करण्यात आला. परंतू पहाडाच्या वरील भागातून वाहणाऱ्या ओढ्यांचे पाणी बोगद्यातून खाली पडू लागले. त्यामुळे पावसाळ्यात रेल्वेसेवा विस्कळीत होत असे. ही समस्या कायमची दूर करण्यासाठी त्यावेळचे इंग्रजकालीन रेल्वे अभियंता हाजरा यांनी डोंगरातून येणारे सर्व पाणी एकत्रितपणे खाली प्रवाहित करण्यासाठी पहाडाचा काही भाग कापून तशी व्यवस्था केली. ते पडणारे पाणी धबधब्याच्या रूपाने खाली पडू लागले. तेव्हापासून हे स्थळ पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाले. आता त्या ठिकाणी लहान मुलांसह मोठ्यांसाठी विविध प्रकारे साहसी खेळ खेळण्याची व्यवस्था केली असून त्यामुळे वर्षभर या ठिकाणी पर्यटक येत असतात.

  आणखी वाचा :

(मुंबईजवळचे पावसाळी पिकनिक पॉईंट्स)

(पिकनिक पॉईंट्स : म्हैसमाळ.. मराठवाड्याचे ‘महाबळेश्वर’)

(पिकनिक पॉईंट्स - पहा नगर जिल्ह्याचे ‘कश्मीर’)

  •  

 

  •  

 

  •  

 

 


 

Web Title: Picnic Point: Hazra Fall (Gondiya)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.